मार्केट कॅपिटलायझेशन” म्हणजे काय ?

    शेअर्स सूचिबद्धच झालेले नाहीत त्या कंपन्या देखील मूल्यवान असतातच

    0
    230
    मार्केट कॅपिटलायझेशन” म्हणजे काय ?
    मार्केट कॅपिटलायझेशन” म्हणजे काय ?

    मुंबई शेअर बाजारमूल्य ४ ट्रिलियन्स डॉलर्स झाले ; त्यानिमित्ताने समजून घेऊया “बाजारमूल्य / मार्केट कॅपिटलायझेशन” म्हणजे काय ?

    समजा शेअर मार्केटवर एकच कंपनी सूचिबद्ध आहे ; तिने १ लाख शेअर्स इश्यू केले आहे ; आणि प्रत्येक शेअरचा आजचा बाजारभाव १०० रुपये प्रति शेअर आहे
    ; तर त्या कंपनीचे बाजार मूल्य १०० लाख रुपये ; म्हणजे १ कोटी रुपये होते

    आता हेच गणित १०० किंवा १००० कंपन्या आणि त्यांच्या शेअरची किंमत असा गुणाकार करून ; त्या सगळ्याची बेरीज केली कि त्या स्टॉक मार्केटचे बाजारमूल्य मिळते

    तर मुंबई शेअर बाजारावर सूचिबद्ध झालेल्या सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य ३३३ लाख कोटी झाले आहे
    ________________________
    यात लक्षात घ्यायचा भाग हा कि वस्तुमाल / सेवा उत्पादन करून विक्री करणाऱ्या , पण ज्यांचे शेअर्स सूचिबद्धच झालेले नाहीत त्या कंपन्या देखील मूल्यवान असतातच , पण त्या वरील आकड्यात येत नाहीत

    भारतासारख्या देशात अन रजिस्टर्ड / ओन अकाउंट एन्टरप्राइसेज , म्हणजे वडापाव गाडी , मोची , किराणा माल दुकान , त्यांचे तर शेअर्सच नसतात , सूचिबद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही

    भारतात हि दोन्ही क्षेत्रे , ज्यांचे शेअर्स इश्यूड आहेत पण लिस्टेड नाहीत आणि ज्यांचे शेअर्सच नाहीत , खूप मोठी आहेत

    इथे आपण पोलिटिकल इकोनॉमीकडे येतोय

    देशाच्या एकूण वस्तुमाल / सेवांच्या उत्पदनात (म्हणजे जीडीपीत ) कॉर्पोरेट क्षेत्राचा वाटा किती , आणि नॉन कॉर्पोरेट क्षेत्राचा वाटा किती हा प्रश्न कळीचा ठरतो ; अमेरिकेत लिस्टेड कॉर्पोरेटचा अमेरिकेच्या जीडीपीमध्ये खूप मोठा वाटा आहे , म्हणून त्याचे मार्केट कॅपिटलायझेशन देखील अवाढव्य आहे

    मग जे स्टॅटिक आहे का ? म्हणजे तहहयात असेच राहणार का ? हा दुसरा प्रश्न पॉलिटिकली लोडेड आहे ; तर भारतात लिस्टेड कॉर्पोरेट क्षेत्राचा भारताच्या जीडीपीमधील वाटा सतत वाढता आहे

    नाव घ्या आणि प्रत्येक क्षेत्रात लिस्टेड कॉर्पोरेट जोरदार मुसंडी मारत आहे ; रिटेल, इस्पितळे , आरोग्य सेवा , शिक्षण देणाऱ्या , करमणूक देणाऱ्या, वीज, विमानतळ , खाणी मोठी यादी आहे ; ज्याचे कोर्पोरेटायझेशन आणि पुढे जाऊन लिस्टिंग हा अगदी अलीकडचा फिनॉमिनॉन आहे

    मला विचाराल कि भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात मूलभूत बदल कोणता होत आहे तर माझे उत्तर हेच आहे : भारतीय अर्थव्यवस्थमध्ये लिस्टेड कोर्पोरेटची पकड दरवारशागणिक वाढत आहे

    याचा खूप मोठा गंभीर परिणाम नॉन कॉर्पोरेट / नॉन लिस्टेड क्षेत्रावर होत आहे ; कारण यांच्या विक्रीतील वाटा खात खात लिस्टेड कॉर्पोरेट क्षेत्र बलदंड होत आहे ; याचा वेग खालील आकडेवारीवरून कळेल

    मुंबई स्टॉक मार्केटवरील बाजारमूल्य गेल्या १५ वर्षात असे वाढले आहे
    २००७ : १ ट्रिलियन डॉलर ; २०१७ : २ ट्रिलियन्स डॉलर्स ; २०२१ : ३ ट्रिलियन्स डॉलर्स आणि २०२३ : ४ ट्रिलियन्स डॉलर्स

    हा फिनॉमिनॉन जागतिक आहे ; जगातील एकूण बाजारमूल्य
    १९८० : ३ ट्रिलियन्स डॉलर्स ; १९९० ; (१०) ; २०००: (३०) ; २०१०: (५४) ; २०२३ : ११२ ट्रिलियन्स डॉलर्स

    १९८० का निवडले ; तर तेव्हापासून जागतिकीकरणाला सुरुवात झाली ; खरतर कोर्पोरेटीकरणाला आणि वित्तियकारणाला ! कारण हीच दोन इंजिन आहेत जागतिकीकरणाची

    पण दुर्दैवाने जागतिकीकरण , खाजगीकरण , उदारीकरण या टर्म्स जनमानसात पोचल्या ताशा कोर्पोरेटीकरण आणि वित्तियकरण या दोन संज्ञा पोचल्या नाहीत ; दुर्दैव का आपले राजकीय जजमेंट कमी पडले /अजूनही पडतंय ?

    संजीव चांदोरकर

    श्रमिक विश्व 

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here