
परभणी, दि. 14 : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत असलेले 3 आधार केंद्र व तहसील कार्यालय, परभणी अंतर्गत असलेले 1 आधार केंद्र असे एकुण 4 आधार केद्रांचे परभणी तहसील कार्यालया समोरील हॉलमध्ये आज दि. 14 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करुन केंद्र कार्यान्वीत करण्यात आले.आधार नोंदणी व आधार दुरुस्ती केंद्राचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी केले.
