परभणी हिंगला मार्गे जोडपरळी केवळ उद्घाटना पुरती सुरु करण्यात आलेली एस.टी. बस तात्काळ सुरू करा..

प्रहार जनशक्ती पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा ..

परभणी – एका महिन्यापुर्वी परिवहन महामंडळाने हिंगला येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दुधना नदीवरील पुलाच्या उदघाटना नंतर लगेचच परभणी – नांदखेडा – करडगांव – हिंगला – वाडी दमई – साडेगाव – सावंगी ( खुर्द ) – जोडपरळी – बोबडे टाकळी या मार्गावर एस. टी. बस सुरु करण्याची घोषणा केली व थाटात या एस.टी. बसचे उदघाटन ही केले परंतु ही एस. टी. बस कार्याक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आली त्यानंतर मात्र एक महिना उलटल्यानंतरही ही एस.टी. बस त्या मार्गावर धावली नाही. केवळ ग्रामीण भागातील जनतेला मुर्ख बनविण्यासाठी परिवहन महामंडळाने एस.टी.बसच्या उदघाटनाचे केवळ नाटक केले होते हा अत्यंत संताप जनक व निंदनीय प्रकार आहे.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी शहरात येतात, दिव्यांग व निराधार लोकांसाठी एसटीचा मोठा आधार असतो शिवाय अनेक छोटया मोठ्या कामासाठी तसेच आरोग्याच्या समस्येसाठी या परिसरातील नागरिकांना जिल्हयाच्या ठिकाणी यावे – जावे लागते यापुर्वी हिंगला येथील पुल अर्धवट असल्याने एस. टी. बस बंद होती परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनानंतर तीन वर्षापासून अर्धवट अवस्थेत बंद पडलेल्या हिंगला पूलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. त्यामुळे या मार्गावर वाहतूक करणे सोपे झाले आहे.

मार्गावर एसटी बस सुरू झाली आहे असे सांगून उद्घाटन करण्यात आले. त्या मार्गाचे एस टी बस सुरू करण्या अगोदर सर्वे न करता व सर्वेचा अहवाल न घेता परिवहन महामंडळाने केवळ ग्रामीण भागातील जनतेला मूर्ख बनवण्यासाठी हा उद्घाटन सोहळा पार पडला असून प्रहार जनशक्ती पक्ष या मनोवृत्तीचा जाहीर निषेध केला.

आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्री बेलसरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व मागील २० वर्षांपासून परभणी – नांदखेडा – करडगांव – हिंगला – वाडी दमई – साडेगाव – सावंगी ( खुर्द ) – जोडपरळी – बोबडे टाकळी या मार्गावर बंद असलेली एस.टी. बस मार्गाचे व्यवस्थित सर्वे करून पंधरा दिवसाच्या आत सुरु करून ती कायम साठी नियमित करावी अन्यथा वरील गावातील सर्व गावकऱ्यांच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्ष परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत परिवहन महामंडळ स्वतः जबाबदार असेल असेही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमिंद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, शहर चिटणीस वैभव संघई, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, ज्ञानेश्वर पांढरकर, सचिन शेरे, सय्यद युनूस इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here