शहर महानगरपालिकेला एका परभणीकर नागरिकाचे अनाहुत पत्र …

  स्वच्छ्ता बाबत आग्रह, ऊर्जेच्या अपव्यवा बाबत दाखल तक्रार.

  प्रति,

  मा. आयुक्त,

  महानगरपालिका,परभणी तथा प्रभाग समिती ब.

  विषय : किमान आठ दिवसांतून एक वेळा तरी नाल्या काढणे बाबत. लाईट पथदिवे दिवसा बंद करावेत.

  महोदय,

  मी खाली सही करणार भगवान कोंडीबा काकडे राहणार वर्मा नगर परभणी येथील कायम रहिवास आहे घरपट्टी,नळपट्टी वेळेवर भरतो .महानगरपालिका परभणी यांच्याकडून खालील प्रमाणे अपेक्षित आहे.

  माझ्या नगरातील असलेल्या नाल्या किमान आठ दिवसातून एक वेळा तरी काढाव्यात काढलेली घाण उचलून न्यावी तसेच जंतू नाशकाचा वापर करावा नाल्या न काढल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे .दिवसा पथदिव्य बंद करावेत भिम नगर रेल्वे गेट ते पारस मेडिकल ते पंचशील नगर येथील पथदिवे पाच महिन्यापासून बंद केलेले नाहीत ते वेळेवर बंद करून उर्जेचा होत असलेला अपयोग टाळावा .

  आम्ही देत असलेल्या टॅक्सचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा वरील समस्या संदर्भात संबंधितांना फोनवर सांगितले तरी दखल न घेतल्याची कारण आम्हाला कळत नाही सेलूचे नगराध्यक्ष भांगडीया, परभणीचे शेषराव देशमुख भाऊ हे स्वतः रिक्षात बसून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करत असे परभणीत ही व्हावे असे वाटते .

  फक्त निवडणुकीदरम्यान प्रत्येक उमेदवाराने मतदारांच्या घरी जाऊनच मत मागावी हे अपेक्षित नाही हे आपले काम आहे असे समजून काम होणे अपेक्षित आहे.

  एक नागरिक

  भगवान कोंडीबा काकडे ,

  वर्मा नगर परभणी.

  श्रमिक विश्व

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here