परभणी : परभणी रेल्वे स्थानकावर कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या होणाऱ्या शोषणाची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कामगारांना बँकेद्वारे केंद्रीय किमान वेतन दिले जात असले तरी त्यातील अर्धा हिस्सा परत रोखीने वसूल केला जात असल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.विशेष म्हणजे, या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार करण्यात आली असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
कामगारांच्या मते, रेल्वे स्थानकावर सफाई सारखी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना त्यांना दिवसेंदिवस शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.कामावर कायमस्वरूपी नेमणूक तर दूरची गोष्ट,पण जेवढे वेतन दिले जाते त्यातही अर्धा भाग कंत्राटदार किंवा संबंधित दलाल मंडळी रोखीने परत घेतात.त्यामुळे कामगारांना फक्त नावापुरते वेतन उरते.
या अन्यायाविरुद्ध काही कामगारांनी पुढाकार घेऊन संबंधित आयोगांकडे तक्रारी केल्या.परंतु,अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने कामगारांमध्ये निराशा आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.महिला कामगारांना यात विशेषतः त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कामगार संघटनांची मागणी
स्थानिक समाजिक कार्यकर्ते आणि श्रमिक संघटनांनी यासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून, रेल्वे प्रशासनाने आणि राज्य पातळीवरील यंत्रणांनी तत्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सरकार आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष?
याप्रकरणी रेल्वे प्रशासन, महिला आयोग, तसेच अनुसूचित जाती आयोगाने तातडीने लक्ष घालून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.प्रकरणी महिला सफाई कामगार लताबाई लांबतुरे, सुजाता सिद्धार्थ कामीटे यांनी कंत्राटदारावर व सुपरवायझर वर गुन्हा नोंद करण्याच्या मागणीला घेऊन दिनांक 15 जुलै 2025 पासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
तुम्ही जे काम हाती घेतलय फार कैतुकास्पद आहे
तुमच्या कार्याला 🙏जय भिम लाल सलाम ✊
✊