फोटो गुगल साभार

आपल्या देशातच नाही तर जगात बहुसंख्य जनता अतिशय निकृष्ट राहणीमान पिढ्यानपिढ्या कंठत आहे ; यासाठी ना जागतिक बँकेची आकडेवारी बघण्याची गरज आहे ना ऑक्सफॅम सारख्या संस्थेची
महानगरातील झोपडपट्या किंवा ग्रामीण भागात उघड्या डोळ्यांनी आणि ओल्या हृदयानी फेरफटका मारला तरी कळू शकते


असे शेकडो कोटी लोक दशकानुदशके अमानवी आयुष्य जगत आहेत हे सर्वाना माहित आहे ; आणि प्रत्येकाकडे त्याची कारणमीमांसा देखील असते ; उदा
लोक आळशी आहेत ; त्यांना शिकायला नको , त्यांना कष्ट करायला नको ; माणूस शिकला त्याने १२ तास कष्ट घेतले तर नक्कीच चान्गले राहणीमान मिळवू शकतो
लोक आपल्याला झेपणार नाहीत एवढी मुले जन्माला घालतात
निसर्गाची लहर ; नैसर्गिक आपत्ती ; दुष्काळ , पूर यामुळे ; निसर्गापुढे माणसाचे काय चालणार
हा काही पिढ्यांचा प्रश्न आहे ; काही पिढ्यनंतर प्रत्येकजण किमान मध्यम / निम्न मध्यम वर्गीय राहणीमान मिळणार आहे
अशी यादी करता येईल


पण खरे आणि सर्वात मूलभूत कारण असते त्या त्या देशातील शासनांनी अंगिकारलेली अर्थव्यवस्था विषयक धोरणे ; आणि काही सामाजिक , परराष्ट्रीय धोरणे देखील
जमिनी संबंधात ; जमिनींची मालकी , हस्तांतरण , सट्टेबाज भांडवलाला लँड मार्केट्स (विशेषतः शहरी ) प्रवेश देणे
जल , जंगल, पर्यावरण विषयक कायद्यातील कॉर्पोरेट भांडवल धार्जिणेपणा
ज्यावर अर्ध्याहून अधिक जनता अवलंबुन आहे अशा शेतीक्षेत्रातील सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधामध्ये , शहरातील पायाभूत सुविधांत दिलेल्या पैशाच्या तुलनेत , पुरेशी गुंतवणूक न करणे
शासनाने अनेक क्षेत्रातून विशेषतः शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक , घरबांधणी मधून बाहेर पडणे
रोजगारनिर्मिती होईल अशी सजग आर्थिक धोरणे न आखणे ; कामगार विषयक कायद्यांचे दात पाडणे
रोजगार आणि स्वयंरोजगारापेक्षा कर्जे देऊन नागरिकांची क्रयशक्ती वाढवणे
आंतरराष्ट्रीय व्यापार करार
दशकानुदशके प्रत्यक्ष करआकारणी वर चुप्पी धरणे ; टॅक्स / जीडीपी रेशो न सुधारणे
सत्तेसाठी ध्रुवीकरणाचे राजकारणामुळे समाज अस्थिर राहतो आणि त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होतात
अतिरेकी राष्ट्रवादाच्या युद्धखोर परराष्ट्र धोरणांमुळे खूप मोठी साधनसामुग्री संरक्षण सिद्धेतवर खर्ची पडते आणि त्या प्रमाणात लोककल्याणासाठी कमी उपलब्ध होत
या यादीत अजून भर घालता येईल


जगातील कंगालपणासाठी पहिल्या गटातील कारणांची जबाबदारी (असलीच तर ) १० टक्के असेल दुसऱ्या गटातील कारणे ९० टक्के कारणीभूत आहेत
तरुणांसाठी
हे समजून घेणे म्हणजे स्वतःचे राजकीय आर्थिक शिक्षण करून घेणे आहे ; राजकीय जाणीव आल्यानंतर त्याचा पुढचा टप्पा आहे राजकीय सत्तेच्या राजकारणाचे महत्व जाणणे ;


संजीव चांदोरकर

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here