Home परभणी जिल्हा अबाबाबा … परभणी जिल्हयात जलसंपदा विभागाची २००० पदे रिक्त

अबाबाबा … परभणी जिल्हयात जलसंपदा विभागाची २००० पदे रिक्त

तत्काळ भरती प्रक्रिया सुरू करावी प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी.

0
619

परभणी : परभणी जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्प असून तेथील ७०-७५% पद रिक्त आहेत यात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२ परभणी, माजलगाव कालवा विभाग क्र.१० परभणी, माजलगाव कालवा विभाग क्र.७ गंगाखेड, माजलगाव प्रकला विभाग परळी वै, जालना पाटबंधारे विभाग अंतर्गत येणारे निम्न दुधना प्रकल्प विभाग सेलू , लघु पाटबंधारे विभाग परभणी या शिवाय जिल्हयात जायकवाडी, निम्न दुधना प्रकल्प, येलदरी, कर्परा, मासोली व लघु प्रकल्प तसंच गोदावरील नतीवरील लोणी, ढालेगाव, नारागव्हा, मुदगल, खड़का, मुळो व डिग्रस बंधा यामुळे जिल्हयाची सिंचन क्षमता वाढली आहे परंतु कर्मचान्यांची वर्ग -१ ते वर्ग ४ पर्यंत जवळपास २००० पदे रिक्त आहेत करिता राज्य शासनाने तत्काळ ही भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मा.ना. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या कडे निवेदनात द्वारे केली आहे.

श्रमिक विश्व फोटो


पैठण डावा कालवा, माजलगाव उजवा कालवा वरील शेतकन्यांना तसेच जिल्हयातील इतर प्रकल्प व बंधाऱ्यावरील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत नाही. निर्मित सिंचन क्षमता पुर्णपणे कार्यान्वीत करण्यासाठी रिक्त पदे भरणे अत्यंत आवश्यक आहे सध्या जिल्हयात एकटया जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध सिंचन प्रकल्प विभागास मान्य पदांपैकी ७० ते ७५ टक्के पद रिक्त आहेत. परभणी जिल्हयातील कुठलाही औद्योगिक विकास न झाल्याने बेरोजगाराचे प्रमाण मालवा प्रमाणावर आहे . या भरतीमुळे जिल्हयातील बेरोजगार उच्च शिक्षित व कमी शिक्षित युवकांना शासकीय नोकरीची संधी मिळेल त्या शिवाय जिल्हामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्प असतानाही केवळ मनुष्यबळ नसल्याने व रिक्त पदामुळे पूर्ण क्षमतेने सिंचन होन नाही. या रिक्त पदांच्या भरतामळे सिंचन क्षेत्र पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत होऊन जिल्हयातील शेतकरी वर्गांना मोठा फायदा होणार आहे. करिता जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या परभणी जिल्हयातील विविध प्रकल्पाअंतर्गत विभागातील रिक्त पदांची भरती तात्काळ करावी व जिल्हयातील शेतकऱ्याना व बरोजगारांना न्याय द्यावा असे ही या निवेदनात म्हंटले आहे. निवेदनाची एक प्रत जलसंपदा राज्य मंत्री मा.ना. बच्चूभाऊ कडू यांना पांनपाठवण्यात आली आहे.

https://youtu.be/1dVIrEAeKf0


निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बाळासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मीडिया प्रभारी नकुल होगे, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, झरी सर्कल प्रमुख शाम भोंग इत्यादी च्या सह्या आहेत.

श्रमिक विश्व न्यूज

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here