आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू ….

राज्‍यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कटीबध्‍द राहण्‍याच्‍या सूचना.

0
454

 

मुंबई, दि. ३० :आरोग्यसेवा आयुक्त आणि राष्ट्रीयआरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला.

आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून श्री. मुंडे यांनी कार्यभार स्वीकारला. त्‍यानंतर त्‍यांनी विविध आरोग्‍य कार्यक्रम व कार्यालयीन व्‍यवस्‍थेचा आढावा घेतला. यावेळी आरोग्‍य आयुक्‍तालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.नेहमी आपल्या कामाने चर्चेत असलेले तुकाराम मुंडे यांची राष्ट्रीय हेल्थ मिशनच्या आयुक्त तथा संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
राज्‍यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कटीबध्‍द राहण्‍याच्‍या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामपातळीपर्यंत सार्वत्रिक, सहजसाध्‍य व माफक आरोग्‍य सेवा राज्‍यातील जनतेला पूरविण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍याच्‍या सर्व निर्देशांकांवर उत्‍कृष्‍ठ कामाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्‍य सेवा अत्‍यावश्‍यक सेवा असून शासकीय आरोग्‍य संस्‍था २४ तास कार्यरत राहतील, आरोग्‍य सेवांपासुन राज्‍यातील कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले.

श्रमिक विश्व न्यूज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here