आर्थिक मंदीचा या काळात कारागिरांशी संवाद …

प्रत्येक्ष जगण्याचे हे प्रश्न आहेत.

परभणी : शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरात,डॉ. साळवे हॉस्पिटलचा समोरच एक दबक्या पत्राचा शेडमध्ये मोटार सायकल दुरुस्तीचे दुकान चालवणारे सय्यद जावेद.मागचा पंधरा वर्षांपासून टू व्हीलरचे मेकॅनिक म्हणून रस्त्याचा कडेला काम करत आहेत.

श्रमिक विश्व फोटो

सय्यद जावेद सांगतात कोरोना काळाच्या नंतर त्यांचा रोजंदारीवर झालेल्या परिणामा बद्दल,कोरोना काळाच्या आधी एक दिवसाला सरासरी तीन ते चार गाड्यांचे (टू व्हीलर ) कामे त्याचा कडे असायची,दिवसाकाठी हजार-दोन हजार रुपये एवढे उत्पन्न व्हायचे.ग्राहक मोटार सायकलचे काम करतांना सढळ हाताने कामे करून घ्यायचे.म्हणजे काही पार्ट विकत घ्यायचा असेल तर आजचा सारखी परिस्थिती नव्हती.एखादी मोटार सायकल दुरुस्त करायची म्हणजे नवीन सामान टाकायला,खर्च करायला ग्राहक अधिक विचार करत नसत,आत्ता पूर्ण पणे विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे,सय्यद जावेद सांगतात.

श्रमिक विश्व फोटो

उत्पन्नाचे गणित बिघडले असून ग्राहक पैसे नसल्याने खर्च करतांना अधिक काटकसर करत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे,सय्यद जावेद पुढे सांगतात कधी मोटार सायकल मधील ऑइल कमी झाले अगर लेवल कमी झाले तरी ग्राहक आता ऑइल बदली करून नवीन ऑइल टाकत नाहीयेत,तर त्यातच ऑइल लेवल करून धकवा असे सांगत असल्याचे त्यांचे सांगणे आहे.पैसे खर्च करणे कमी झाले आहे,परिणामी चार-चार दिवस हाताला काम नाहीये आणि ग्राहकाची वाट पाहत बसून राहावे लागत आहे.

सय्यद जावेद लहान असल्यापासून या व्यवसायात आहेत,आता पन्नाशीत असलेल्या जावेद यांना या आर्थिक मंदीचा काळात इतर कोणता व्यवसायात ही जाणे शक्य नाहीये.संपूर्ण मार्केटवर मंदीचा कशाप्रकारे परिणाम झाला आहे,जीवन आवश्यक वस्तूंचा वाढणाऱ्या किमती आणि पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर रोज वाढणारे भाव सामान्य माणसाचे जगण्याचे गणित विस्कटून टाकणारे ठरत आहे.

पेट्रोल-डिझेलचा वाढत्या किमती मोटारसायकल चालवणाऱ्यांचा खर्चावर सुद्धा कसे परिणाम करत आहे,या बाबत सांगतांना सय्यद जावेद सांगतात की एखादी मोटारसायकल दुरुस्ती साठी आणली तर दुरुस्ती करते वेळी थोडे पेट्रोल गाडीतून घेऊन पार्ट धुतले जातात,कित्येकदा गाडीतच पेट्रोल कमी असल्याने पेट्रोल संपते.मग ग्राहक म्हणतो सकाळीच पन्नास रुपयांचे पेट्रोल भरले होते,आता ग्राहकांसमोरच पेट्रोल काढले असल्याने ठीक आहे,पण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

घरातील जेष्ठांचे आजार, मुलांचे शिक्षण,घर खर्च आणि कामाची ही स्थिती याचे ताळमेळ संभाळणे अत्यंत अवघड झाल्याचे जावेद भाई यांचे म्हणणे आहे,दिवसभर कामाचा जागी थांबून थोडे मनशांती साठी घरी गेलोत तर घरी पुन्हा सामान-सुमान आणायची चिंता पिच्छा सोडत नसल्याचे त्यांचे सांगणे आहे.

श्रमिक विश्व रिपोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here