कोविडच्या साथीचा प्रसार थांबविण्यासाठी ग्रामीण जनतेचा घरोघरी जाऊन आरोग्य सेवा देण्याचे काम जर कोणी केल असेल तर ते आशा कार्यकर्त्यांनी.सुरक्षिततेच्या पुरेशा साधनांशिवाय जोखीम घेऊन त्या हे काम अत्यंत तुटपुंज्या मानधनावर कोव्हीड-१९ चे काम करत आल्या आहेत.कोविड काळात त्यांना अतिरिक्त कामाचा भार असून कोविड संदर्भातले वेगळे पुरेसे मानधन मिळत नाही.आणि त्याच बरोबर त्या नेहमी ७२ प्रकारची कामे करतात त्यातील अनेक आता या कोव्हीड काळात केली जात नसल्याने त्यातून मिळणारे मानधन बंद झाले आहे.त्यामुळे त्यांना पुरेसे मानधन वेळेवर मिळावे म्हणून संघर्ष करावा लागत आहे हे महाराष्ट्राला लांच्छनास्पद असल्याचे जन आरोग्य अभियानाचा वतीने प्रसिद्धी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

फोटो गुगल साभार

आशा कार्यकर्त्या आरोग्य व्यवस्थेचा नियमित सरकारी कर्मचारी नाहीत आणि त्यांना कोणत्याही सामाजिक सुरक्षितता नसतांना,न्याय वेतन नसतांना,कामगार कायद्यांना वळसा घालून त्यांच्याकडून अतिरिक्त काम करवून घेतले जात आहे,म्हणून त्यांचा मागण्या पूर्णपणे न्याय आणि रास्त असल्याचे नमूद केले आहे.

राज्य भरातील सर्व आशा कार्यकर्त्यांना जगण्यासाठी किमान वेतन नियमितपणे मिळावे;कोरोना संबंधित कामाचा मोबदल्यात वाढ द्यावी; कोरोना संबंधी काम करण्यासाठी तीनशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे विशेष भक्ता देण्यात यावा आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा आणि गटप्रवर्तक यांना प्राधान्य देण्यात यावे या त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आशा 15 जून पासून संप करत आहेत कारण त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही.

आशांचा संप हा केवळ मानधनासाठी ची लढाई नाही तर हे एकूण आरोग्य व्यवस्थेचा दुर्दशेचे एक लक्षण आहे, हे समाजाने समजून त्यासाठी पाठिंबा देणे आवश्यक आहे. अशा कार्यकर्त्यांसाठी निधी नाही असे कारण जर सरकार सांगत आहे त्या जीवघेण्या मारामारीचा काळात जनतेचे आरोग्य आणि जीव वाचविणे ते सरकारचे प्राधान्य नसेल तर दुसरे काय आहे ? सर्वात श्रीमंत आशा एक टक्का लोकावर कोणताच कर राज्य सरकार बसू शकत नाही का ? आधांचा न्याय आणि रास्त मागण्यांसाठी जन आरोग्य अभियान महाराष्ट्र यांच्या लढ्यात त्यांच्यासोबत आहे आणि सर्व मागण्यांसाठी पाठिंबा देत आहे असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

फोटो गुगल साभार

निवेदनावर डॉक्टर आनंद फडके, डॉक्टर अभय शुक्ला,गिरीश भावे डॉक्टर सतीश गोगुलवार,कोम्रेड शंकर पुजारी,रंजना कान्हेरे,काजल जैन,अविनाश कदम,अड. बंड्याा साने, ब्रिनेेेेल् डिसोजा, डॉक्टर मधुकर गुंबले, डॉक्टर शशिकांत अहंकारी, ललिता राजपूत,राजूूूूू थोरात, कामयांनी महाबल, पूर्णिमा चीकरमानेे, डॉक्टटर अभिजीत मोरे,सचिन देशपांडे, डॉक्टर किशोर मोघेेेे, नितीन पवार, सोमेश्वर चांदुरकर,शैलजा आराळकर, अविल बोरकर, मीना शेेेशू, शुभांगी कुलकर्णी, तृप्ती मालती, शहाजी गडहिरेे, डॉक्टर स्वाती राणे, रवी देसाई, शकुंतला भालेराव आदींची नावे आहेत.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here