पुणे महानगरपालिकेच्या पोकळ आश्वासनांना आणि तात्पुरत्या मुदतवाढीला कंटाळून ‘स्वच्छ’च्या कचरावेचकांनी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट, २०२१ पासून साखळी उपोषण करण्याचे ठरवले आहे.
शहराच्या स्वच्छतेच्या कामात कोणताही खंड न पाडता हे साखळी उपोषण होणार आहे. कचरावेचकांचे व शहराचे हित जपण्यासाठी या कचरावेचकांना आंदोलनात सामील होऊन त्यांना समर्थन द्या.असे आव्हान करण्यात आले आहे.
आंदोलनाची वेळ – सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१, सकाळी ११:०० वाजता
स्थळ – पुणे महानगरपालिका इमारती समोर.
श्रमिक विश्व न्युज