करोना काळातील उपचार खर्च : खाजगी हॉस्पिटलच्या देयेकांचे परीक्षण करण्याची गरज

जन आरोग्य अभियानचा सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष.

0
314

नाशिक : खाजगी रुग्णालयांमधील कोविड उपचारासाठी शासनाने जाहीर केलेल्या दर पत्रकाच्या तुलनेत प्रत्यक्ष प्रत्येक रुग्णाकडून सरासरी एक लाख ५५ हजार रुपयांची अतिरिक्त आकारणी झाल्याचे धक्कादायक निष्कर्ष जन आरोग्य अभियान आणि विधवा पुनर्वसन समिती तर्फे करण्यात आलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून समोर आले आहेत.त्यामुळे शासनाने एक आयोग नेमून या खर्चाचे ऑडिट करावे व कर्जबाजारी कोवीड विधवांना त्यांच्याकडून झालेली अतिरिक्त बिलांची आकारणी परत मिळवून द्यावी अशी मागणी नाशिक मध्ये झालेल्या संताप सभेत करण्यात आली.

फोटो गुगल साभार

कोविडच्या उपचारासाठी खासगी रुग्णांसाठी आरोग्य खात्याने दरपत्रक जाहीर केले होते एका बेडसाठी प्रतिदिन चार हजार रुपये, आय सी यू साठी ७ हजार रुपये आणि व्हेंटिलेटर बेडसाठी ९ हजार रुपये असा दर आखून देण्यात आला होता.प्रत्यक्षात किती खर्च आला यासाठी जन आरोग्य अभियान आणि कोविड विधवा पुनर्वसन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील २० जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या परिवाराचे सर्वेक्षण करण्यात आले,यात रुग्णावर किती दिवस उपचार करण्यात आले त्यासाठी रुग्णालयाचे किती बिल आकारण्यात आले औषधांचा खर्च किती आला,याची माहिती घेण्यात आली यावेळी पतीच्या उपचारासाठी झालेली फरफट आणि उपचारांच्या खर्चासाठी डोक्यावर चढलेल्या कर्जाचा बोजा याबाबत कोविड विधवांनी यावेळी त्यांच्या व्यथा मांडल्या जन आरोग्य अभियान अभ्यासक डॉक्टर अभय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नाशिकमधील संताप सभेत मांडण्यात आले सभेची प्रस्तावना हेरंब कुलकर्णी यांनी केली तर स्वागत लोक निर्णय संस्थेचे संतोष जाधव यांनी केले.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here