कोट्यवधी मुले अक्षरओळख,वाचनक्षमता ,आणि जुजबी हिशोब यापासून आजन्म वंचित राहतील ; आजन्म !

ते म्हणजे गरीब कुटुंबातील शाळेच्या वयातील मुलांचे शिक्षण !

1
537

कोरोना संकट आणि त्याने अर्थव्यवस्थांमध्ये उडवलेला हाहाकार न भूतो आहे , “आहे” कारण तो संपलेला नाही म्हणून ; अजूनही बरेच काही घडू शकते.

फोटो गुगल साभार

जागतिक कॉर्पोरट भांडवलशाही क्रायसिस कडे तंत्रज्ञान विकास , भांडवल गुंतवणूक , नवीन प्रॉडक्ट्स आणि नवीन मार्केट संधी म्हणून बघते ; हे त्या प्रणालीचे खूप मोठी सामर्थ्य आहे

“ज्या गोष्टींना काही दशके लागू शकली असती त्या गोष्टी काही दिवसात / आठवड्यात घडतात” हे इतिहासात डोकावले तरी कळते

मध्यम / उच्च मध्यमवर्गीयांसाठी राबणाऱ्या बँकिंग , अन्नपदार्थ घरपोच, वर्क फ्रॉम होम, रिटेल, लससंशोधन अशा अर्थव्यवस्थांच्या उपक्षेत्रात गेल्या दीड वर्षात प्रचंड वेगाने बदल घडवले जात आहेत ; जे इथे कायमचे वास्तव्यास आले आहेत


फक्त एकच समाजघटक आणि त्यांना सेवा देणारे एक सेवाक्षेत्र काही दशके मागे गेले आहे :

ते म्हणजे गरीब कुटुंबातील शाळेच्या वयातील मुलांचे शिक्षण !

आणि जागच्या पातळीवर त्यांची संख्या काही कोटींमध्ये असेल

काही अभ्यास दाखवून देत आहेत कि कोट्यवधी मुले अक्षरओळख , वाचनक्षमता , तोडके मोडके लिहिण्याची क्षमता , आकडे ओळख आणि जुजबी हिशोब यापासून आजन्म वंचित राहतील ; आजन्म !


हे त्या मुलांच्या / कुटुंबाच्या साठी खूप मोठी व्यक्तीगत शोकांतिका आहे, असणार आहे ; एक प्रसन्ग नाही तर आयुष्य भराची शोकांतिका

पण माझी हि पोस्ट उरबडवेपणा नाही ; तर याचे स्थूल अर्थव्यवस्थांवर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधू इच्छिते

हि मुले प्रौढ बनून २०३५ ते २०४० च्या दरम्यान अर्थव्यवस्थांच्या श्रमिक वर्गात खेचली जातील ; पोट भरण्यासाठी त्यांना स्वतःला सामील व्हावे लागेल

विशिष्ट वयात वर उल्लेख केलेली किमान कौशल्ये नसल्यामुळे या कोट्यवधी श्रमिकांची उत्पादकता काय असेल ; एकत्र काम करतांना ते टीमचे सभासद होऊ शकतील का ? त्याचा त्यांच्या वेतनमानावर / मासिक आमदानीवर काय परिणाम होईल ? कमकुवत क्रयशक्तीमुळे वस्तुमाल सेवांच्या मागणीवर काय परिणाम होईल ? जीडीपीवर /अर्थव्यस्वाथांवर नक्की काय परिणाम होईल ?


हे प्रश्न मनात येण्यासाठी कोणी अर्थतज्ञ असण्याची खरेतर गरज नाही , पण पीएचडी / पोस्ट डॉक्टरल केलेले नवउदारमतवादी अर्थतज्ज्ञ किती जोरकस पणे हे इश्युज राष्ट्रीय अजेंड्यावर आणत आहेत

लक्षात घ्या आपण व्यक्तिगत शोकांतिकांनी या अर्थतंज्ञानी आपापली हृदय पिळवटून घ्यावीत अशी अपेक्षा करत नाही आहोत ; त्यांनी अर्थव्यवस्थांवर होणाऱ्या मॅक्रो परिणामाबद्दल बोलावे अशी अपेक्षा ठेवत आहोत

आणि याना स्वार्थांधळे , कोर्पोरेटची झापडे लावलेले , अर्थअडाणी म्हटले कि त्यांना झोंबते

संजीव चांदोरकर

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here