कोरोना विधवा भगिनींचे मुख्यमंत्र्यांना दिवाळी निमित्त पत्र …

मुख्यमंत्री उद्धव भाऊराया यांना भावनिक हाक

0
528

दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव भाऊराया यांनी मदत करावी यासाठी कोरोनात विधवा झालेल्या भगिनी मुख्यमंत्री यांना महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातुन पत्र पाठवत आहेत.
केवळ ५०,००० रुपये इतकी अत्यल्प रक्कम न देता केंद्र सरकारने एक लाख व राज्य सरकारने एक लाख रुपये द्यावेत अशी या भगिनींची मागणी आहे.

श्रमिक विश्व फोटो

प्रिय उद्धवभाऊ ठाकरे,
मुख्यमंत्री ,

माझे पती कोरोनात वारले.राज्यात दिवाळी साजरी होत असतांना आज माझ्यासारख्या हजारो विधवा भगिणींची कुटुंबे दुःखात आहेत.हॉस्पिटल बिलामुळे कर्जबाजारी आहेत.तुम्हीच आमचे भाऊ आहात. आमचा कुटुंबाला महाराष्ट्र सरकारचा वतीने कमीत कमी एक लाख रुपये मदत करावी,तसेच आमच्यासाठी काही रोजगार निर्माण करावा.आम्ही कष्ट करून जगू

उद्धवभाऊ ,तुम्ही आमच्या कुटुंबासाठी काही करावे हेच मागणे मागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here