परभणी – जिल्हयामध्ये कोवीड -१९ च्या संक्रमणामुळे आता पर्यंत १२९२ नागरीकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये अनेक अशी कुटुंब आहेत की ज्यांच्या घरी कोवीड संक्रमणा मुळे घरचा कर्ता पुरुष व काही कुटुंबात आई व वडील दोघे मयत झाले आहेत त्या मुळे अनेक कुटुंबात आज कोणी कमावते राहिले नाही. अश्या या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक ३१ जून २०२१ रोजीच्या आदेशानुसार व त्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिनांक ११ सष्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोवीड -१९ संक्रमनाने मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना ५०,००० रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन कार्य पध्दती महाराष्ट्र शासनाकडून अधिसूचित करण्यात येणार आहे. परंतु परभणी जिल्ह्यामध्ये अद्याप कुठल्याही कार्यवाही ला सुरुवात झाली नाही.
मा प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थान, मदत व पुर्नवसन विभाग यांचे दिनांक १२ ऑक्टोंबर २०२१ पत्रान्वये निर्देशित केल्यानुसार कोवीड -१९ या आजाराने मयत झालेल्या वारसांना रु . ५०,००० रुपये एवढे सानुग्रह अनुदान तात्काळ वितरीत करावे या मागणी साठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बाळासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मिडिया प्रभारी नकुल होगे, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, झरी सर्कल प्रमुख शाम भोंग, वैभव संघई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
श्रमिक विश्व न्यूज