गरिबांसाठी “ देअर इज नो फ्री लंच “ ; पण भांडवलासाठी ? सेव्हन कोर्स मिल !

ज्यांच्याकडे ऍसेट्स असतात त्यांना फ्री लंच मिळत असतो

0
386

भारतसकट जगातील अनेक गरीब देशातील लोककल्याणकारी योजना बंद पाडण्यासाठी नवउदारमतवादाने जणू मोहीमच उघडली होती / आहे.

फोटो गुगल साभार

त्यात सर्वात महत्वाचा हल्ला आहे तो लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर ; त्यातून नवीन नॅरेटिव्ह सेट केले गेले ; खूप हाय व्होल्टेज प्रचार करून लोकांचा ब्रेनवॉश केला गेला

There Is Nothing Like Free Lunch ; म्हणजे फुकटात जेवण कोणालाही मिळणार नाही ; तुम्हाला स्वतःचे / कुटुंबाचे पोट भरायचे असेल , चान्गले राहणीमान हवे असले तर स्वतः कष्ट करून पैसे मिळवा

प्रत्येकाने कष्ट करूनच स्वतःचे संसार चालवावेत ! शासनाकडून फुकटात मिळवायची धडपड करू नका ; तुम्ही समाजावर बंडांगुळ आहात


पण भांडवल ? भांडवल स्वतः काहीही कष्ट न करता अव्वाच्या सव्वा मिळकत मिळवत असते

शेअर्स , रोखे बाजार , जमिनी , रिअल इस्टेट , सोने , क्रिप्टो असे कितीतरी ऍसेट्स आहेत , ज्यांच्या किमती सतत वाढवत ठेवल्या जातात ; इतक्या कि ऍसेट बबल तयार केला जातो

आणि त्यातून मिळणारा भांडवली नफा / कॅपिटल गेन्स हा श्रीमंत लोकांचा सर्वात महत्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे ;
दुसऱ्या शब्दात ज्यांच्याकडे ऍसेट्स असतात त्यांना फ्री लंच मिळत असतो

जगातील फक्त १० लोकांकडे ७० टक्के ऍसेट्स केंद्रित झाले आहेत आणि अर्थात फक्त त्यांनाच भांडवली नफ्याचे उत्पन्न मिळते

भारतासकट सर्व जगात भांडवली नफ्यावर कष्ट करून मिळवलेल्या उत्पन्नपेक्षा कमी कर आहे

अमेरिकेत सर्वात श्रीमंत लोकसंख्येच्या १ टक्का लोकांच्या वार्षिक उत्पन्नातील ६० % (प्रत्येक १०० डॉलर्स मधील ६० डॉलर्स) भांडवली नफ्यातून / कॅपिटल गेन्स मधून येतात ; म्हणजे काहीही कष्ट न करता


जगातील आर्थिक विषमता वर्षागणिक वाढत असल्याचे रिपोर्ट येत असतात ;

भांडवलाची अधिसत्ता आणि त्यातून कोणतेही श्रम न करता त्याला मिळणारे लाखो कोटी रुपये यावर वैचारिक हल्ला चढवल्याशिवाय काहीही बदल संभवत नाहीत

अर्ध अर्थ-शिक्षित लोकांसाठी ; फालतू कमेंट करण्यापूर्वी :

भाग भांडवल गुंतवणूकदारांसाठी लाभांश / डिव्हीडंड ; कर्ज देणाऱ्यांसाठी व्याज , जमीन , जागा भाड्याने देणाऱ्यांसाठी भाडेपट्टी मिळाली पाहिजे ; त्याचा भांडवली नफ्याशी काहीही संबंध नसतो

आणि जर तुम्ही म्हणाल कि हे कायद्याला धरून आहे ; तर आम्हाला आमच्या जनप्रतिनिधी निवडून कायदा बदलावा लागेल

जनकेंद्री लोकांसाठी

भांडवलशाहीवर नुसते नैतिक , सट्टेबाज असली लेबले लावणे सोपे आहे;

त्या प्रणालीतील वैचारिक व्यूहातील दुट्टपीपणा , खोटारडेपणा , अभ्यासपूर्वक बाहेर आणण्याचे, त्यांचे प्रत्येक नॅरेटिव्ह खरवडून काढण्याचे आणि लोकशिक्षण करण्याचे आव्हान कठीण आहे ;

संजीव चांदोरकर.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here