घरकुल योजनेतील प्राथमिकता निश्चित करून दिव्यांग, निराधार, विधावा व परितक्त्यांना प्राधान्य द्या..

प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी..

0
289
Advertisement

परभणी – ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद मार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी बनविण्याचे काम सुरु असून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने गावातील गरजवंत लोकांच्या नावांची घरकुलासाठी शिफारस करणे आवश्यक असते परंतु गावातीन घरकुल लाभार्थींची यादी बनवित असताना मर्जीतल्या लोकांना घरकुल कसे मिळतील याचा प्रयत्न जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायती कडून केला जात आहे. गावातील गरजवंत व बेघर असलेले दिव्यांग, निराधार, विधवा व परितक्त्या महिला यांना या यादीमध्ये प्राथमिकता देणे आवश्यक आहे परंतु यामध्ये अक्षम्य लापरवाही केली जात असून शासनाच्या आदेशानंतरही ग्रामपंचायत कडून प्राथमिकता निश्चित केली जात नाही व ज्या नावांची शिफारस ग्राम पंचायतीने केली आहे अश्या नावाची ग्रामसभेत मंजूर करण्याचा नियम असताना हि. फक्त कागदावर ग्रामसभा झाली असे दाखवून घरकुलांची यादी तयार केली जात आहे. त्यामुळे गावातील खरे लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहत आहेत. राजकीय हेवेदाव्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची यादी तयार करतांना जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायती कडून भेदभाव केला जातो व मर्जीतल्या लोकांचीच शिफारस केली जाते व घरकुल योजनेची गरज असणाऱ्या बेघरांना मात्र या यादीमध्ये स्थान मिळत नाही ही दुर्देवाची बाब आहे. त्या मुळे मा. जिल्हाधिकारी मॅडम यांनी याकडे जातीने लक्ष घालून जिल्ह्यातील घरकुल योजनेतील लाभार्थ्याची शिफारस केली जात असताना प्रत्येक ग्रामपंचायतीने क्रम ठरवून गावातील बेघर असलेले दिव्यांग , निराधार , विधवा व परितक्ता महिला यांना प्राथमिकता देऊन यांच्या नावाची शिफारस केल्यानंतरच इतर नावांची शिफारस करावी अशी सूचना मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या मार्फत ग्रामीण विकास यंत्रणेस करून गावातील खऱ्या गरजवंताला घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

श्रमिक विश्व फोटो


निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, गंगाखेड तालुका प्रमुख शिवाजी जाधव, परभणी तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, मानवत तालुका प्रमुख गोविंद मगर, उप तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पूंजारे, सर्कल प्रमुख श्याम भोंग मीडिया प्रभारी नकुल होगे, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव व वैभव संघई इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

श्रमिक विश्व न्यूज

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here