चंद्रपूर जिल्ह्यात माय-लेकीचा भुकेने तडफडून मृत्यू !

पुरोगामी महाराष्ट्राच्या भुकेचे दाहक वास्तव.

0
361

चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी या गावात मागील महिनाभरापासून अन्न व पाणी न मिळाल्यामुळे मायलेकीचा राहत्या घरात तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रायक व तितकीच समाज म्हणून मानवी मनाला सुन्न करणारी घटना काल शनिवारी सकाळी कोठारी येथे उजेडात आली. चंद्रपूर येथील न्यूज कट्टा ब्युरो या न्यूज पोर्टल वर प्रकाशित १२ सप्टेंबर २०२१ च्या बातमी नुसार झेलबाई पोचू चौधरी (७३ ) वर्ष व तिची मुलगी माया मारुती पुलगमकर ( ४५ ) वर्ष अशी मृतकांची नावे आहेत त्यांच्या मृत्यूच्या बातमीने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भुकेने मालकीच तडफडून मृत्यू झाल्याने ही घटना शासन, प्रशासनकर्त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

न्यूज कट्टा मध्ये प्रकाशित बातमीनुसार बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावांमधील वार्ड क्रमांक पाच मध्ये एका लहानशा घरात 73 वर्षीय झेलाबाई पोचू चौधरी व तिची मुलगी माया मारुती पुलगमकर 45 वर्ष अनेक वर्षापासून रहिवासी असून त्या निराधार होत्या त्यांना मागेपुढे कोणी नसल्याने त्या एकमेकांच्या आधाराने जगत होत्या. गावात मागून व कोणी दिलेल्या अन्नावर जीवनचारित्र भागवत होत्या सकाळी व संध्याकाळी फिरत दिसणाऱ्या मायलेकी मागील महिन्याभरापासून अचानक दिसेनाशा झाल्या त्या आजाराने ग्रस्त व शरीर अशक्त झाल्याने बाहेर चालले शक्य होत नसल्याने त्या घरातच पडून राहत होत्या शेजाऱ्यांनी ही कधी त्यांच्याशी विचारपूस केली नाही.अशातच अन्न व पाणी मिळाले नसल्याने त्या घरातच पडून मृत्यू पावल्या होत्या. त्यांच्या घराचे दार उघडलेच होते व गावातील मोकाट कुत्रे घरात शिरून त्यांच्या अंगावरील कपडे ओढून त्यांचा मृतदेह नग्नावस्थेत व शरीराचे लचके तोडल्याचेही दिसून आले.त्या मयलेकीचा मृत्यू दुर्दैवी व मानवी मनाला सून करून थरकाप उडविणारा होता.काल शनिवारला सकाळी शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे डोकावून पाहिल्यानंतर त्यांना माय-लेकीचा मृत्यू झाल्याची व शरीर अत्यंत गंभीर अवस्थेत दिसून आल्यानंतर वार्डातील रहिवासी जमा होऊन पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर दाखल होऊन नग्न शरीरावर कपडे टाकून प्रेत ताब्यात घेतले व उत्तरीय तपासणीसाठी बल्लारपूरला रवाना केले आहे.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here