दारिद्र्याची व्याख्या रुपयात आणि डॉलर मध्ये का ठरवायची ?

संजीव चांदोरकर

३० वर्षाच्या आर्थिक सुधारणा, आर्थिक समानता , दारिद्र्य निर्मूलन , बौद्धिक अप्रामाणिक मॉन्टेकसिंग (बहुवचनी संज्ञा) आणि त्यांचे आंधळे फोल्लोअर्स

१९९१ नंतर सुरु झालेल्या आथिर्क सुधारणांचा लेखाजोखा मांडला जात आहे ; त्याचे स्वागत ; मॉन्टेकसिंग अहलुवालिया त्या आर्थिक सुधारणांचे एक आर्किटेक्ट.

फोटो गुगल साभार

त्यांनी एक मुद्दा मांडला आर्थिक समानता आणि दारिद्र्य निर्मूलन या दोन भिन्न गोष्टी आहेत. देशात आर्थिक विषमता वाढली असेल, पण आर्थिक सुधारणांनी अनेक नागरिक दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढले गेले आहेत

हि मांडणी नवउदारमतवादी गेली ४० वर्षे मांडत असतात. त्या अर्थाने ती प्रातिनिधिक आहे; म्हणून मॉन्टेकसिंग बहुवचनी


चला चर्चेसाठी मान्य करू; नवउदारमतवादी म्हणतात आर्थिक विषमता राहणार पण गेल्या ३० वर्षात आम्ही दारिद्र्य निर्मूलन केले असे तुम्ही सेल्फ सर्टिफाय करायचे आणि आम्ही विश्वास ठेवायचा ? तुम्ही ब्रेन वॉश केलेले तुमचे आंधळे फोल्लोअर्स विश्वास ठेवतील , पण आम्ही आमची अक्कल गहाण नाही ठेवली सर

काही मुद्दे

() आर्थिक धोरणे आणि सामाजिक / राजकीय संतोष / असंतोष यांचा काही जैविक संबंध असतो कि नाही मॉन्टेकसिंगजी ?

सामाजिक असंतोष दारिद्र्यामुळे नव्हे आर्थिक विषमतेमुळे पसरतो हे काय तुम्हाला माहित नाही. आणि या असंतोषामुळे होणारे हजारो कोटी रुपयांचे नुकसान ? आणि विशिष्ट उत्पादन पद्धतीमुळे झालेले पर्यावरणाचे नुकसान आणि येत असलेली अरिष्टे ?
कोणाच्या नावावर बिल फाडायचे ?

देशात आणि जगात हा असंतोषाचा लाव्हा निरनिराळ्या मार्गाने उफाळून येतोय याचा तुम्ही भलावण केलेल्या आर्थिक धोरणांशी काही संबंध नाही

चला तुम्ही निवडा देशातील कोणतेही राज्य , शहर . ग्रामीण भाग आणि आपण दौरा करू; नागरिक आनंदी आहेत का विचारू . दिल्लीच्या इन्स्टिट्यूशनल एरिया छानच आहे सर

() नागरिक दारिद्र्यातून बाहेर काढले म्हणजे काय ? तुम्ही ती जागतिक बँकवाली २ डॉलर्स पर डे (समजा १५० रुपये प्रतिदिन) वाली व्याख्या लावणार.

पण महागाईमुळे नागरिकांचे दैनंदिन वेतन सतत वाढत गेले आहे ; म्हणजे काहीही न करता अर्थव्यस्वस्थेतील वेतनमान वाढतच असते , ते कधीतरी १५० रुपये ओलांडणार आणि तुम्ही म्हणणार बघा तो दारिद्र्य रेषेच्या वर आला ?

सर मुद्दा असतो , जो तुम्हाला अर्थतज्ज्ञ म्हणून माहित आहे, किमान राहणीमान टिकवण्यासाठी वस्तुमाल-सेवांच्या उपभोगाचा

दारिद्र्याची व्याख्या रुपयात आणि डॉलर मध्ये का ठरवायची ? स्त्रियांमधील हिमोग्लोबीन , लहान मुलाचा आणि प्रौढांचा बॉडी मास रेशो , त्यांचे आयुर्मान हे असे निकष का नाही ?


वरील प्रश्न माझे नाहीत ; हे गेली ३०-४० वर्षे अनेक डाव्याच नाही तर डाव्या न म्हणवणाऱ्या (जोसेफ स्टिग्लिट्झ , थॉमस पिकेटी) यांच्यापासून अनेकांनी सतत विचारले आहेत.

अनेकानेक मॉन्टेकसिंग त्याकडे दुर्लक्ष करणार कारण ते बौद्धिक अप्रामाणिक आहेत ; त्यांची जगातील फेलो ह्यूमन बीइंग बद्दलची संवेदनशीलता हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे म्हणून मी तो उपस्थित करत नाही ;

आंधळ्या अनुयायांबद्दल बोलायला नको ; मांडणी करणाऱ्याला डावे वगैरे शेलके लेबल लावायचे म्हणजे गाभ्यातील टोकदार प्रश्नांना तोंड द्यावे लागत नाही.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here