नांदेडच्या शासकीय रुग्णालयात डुकरांनी लचके तोडलेल्या रुग्णाचा मृत्यू …

नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील होता रुग्ण.

नांदेड शासकीय रुग्णालयात रुग्णाचे डुकरांनी लचके तोडले.
नांदेड शासकीय रुग्णालयात रुग्णाचे डुकरांनी लचके तोडले.
नांदेड शासकीय रुग्णालयात रुग्णाचे डुकरांनी लचके तोडले.

नांदेड : क्षय रोगाच्या उपचारासाठी नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील तुकाराम नागोराव कसबे (वय ३५) या नांदेड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाचा डुकरांनी लचके तोडल्याने मृत्यू झाला आहे.क्षय रोगाच्या उपचारासाठी या रुग्णालयात दाखल झाला होता.लोकसत्ता दैनिकात प्रकाशित करण्यात आलेल्या बातमी नुसार नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील तुकाराम नागोराव कसबे हा क्षयरोगाच्या उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. उपचारा नंतर गुरुवारी (दि.९) त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

घरी गेल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा शुक्रवारी याच रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु तेथे गर्दी असल्याने रात्री जेवण करून तो परिसरातील चिंचेच्या झाडाखाली झोपला होता.मात्र त्याच वेळी डुकराच्या एका कळपाने त्याच्यावर हल्ला चढवत त्याचे लचके तोडले. तुकारामच्या कमरेखालचा भाग व नाक,गाल हे डुकरांनी अक्षरशः तोडून काढले.त्यामुळे तुकारामचा जागीच मृत्यू झाला.ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने धावपळ करत मृतदेह ताब्यात घेतला. तोपर्यंत ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी ग्रामीण पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गत महिन्यात २४ तासात २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याचा प्रकारानंतर राज्यभरात येथील आरोग्य व्यवस्थेचा विषय चर्चेत आला होता.

श्रमिक विश्व 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here