परभणी : 30 सप्टेंबर परभणीत गोर सेनेच्या वतीने सोनपेठ अत्याचार पीडितेच्या न्यायासाठी आक्रोश महा मोर्चा.
सोनपेठ येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहजे,या प्रमुख मागणीसह सदरील प्रकरण फास्टट्रॅक
कोर्टात चालवण्यात यावे,सदर प्रकरण हाताळण्यासाठी सरकारी वकील ऍड. उज्जवल निकम यांनी नियुक्ती करण्यात यावी.तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,संबंधित पोलीस कर्मचारी,व आंबेजोगाई आणि लातूर वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून सहआरोपी करावे व तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे,पीडितेच्या कुटुंबियांना शासनामार्फत नुकसान भरपाई म्हणून किमान २५ लक्ष रुपये देण्यात यावे आणि पीडितेच्या कुटुंबातील एक सदशयाला सरकारी नौकरी देण्यात यावी या मागण्या घेऊन परभणी,हिंगोली सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या वतीने गोर सेनेच्या वतीने मोठ्या संख्येने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
श्रमिक विश्व न्यूज