परभणी : जागरूक नागरिक आघाडीची संकल्पना आणि मूर्त स्वरूप एका नाट्यमय घडामोडीतून निर्माण झाल्या नंतर आता आघाडी संपूर्ण जिल्ह्यात आपले संघर्षाचे बीज रोवण्याचा तयारीला लागली आहे.परभणी शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स मधील अथीती सभागृहात आज दि. १५ रोजी जागरूक नागरिक आघाडीचा वतीने ४ वा घेण्यात आलेल्या बठकीत अनेक पक्षांचा कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिक,वकील व विविध क्षेत्रात कार्यरत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.विशेष म्हणजे महिलांनी हि यावेळी बैठकीला हजेरी लावून आपले मनोगत व्यक्त केले.
जागरूक नागरिक आघाडीची सुरुवात ज्या समाज माध्यमांचा वर झाली,त्याचाच उपयोग घेत या बैठीकेचे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण सभागृह भरून नागरिक उपस्थित राहिले तथा परस्पर विरोधी राजकीय विचारांचा लोकांनीही इतरांच्या विचार स्वातंतत्र्याचा आदर ठेऊन नागरी प्रश्नांचा अनुषंगाने जागरूक नागरिक आघाडीचा आंदोलनात,व कार्यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा समन्व्यकांनी व्यक्त केली.
येणाऱ्या १७ ऑगस्ट रोजी परभणी शहरातील जिल्हा परिषेदेच्या नूतन इमारती समोरील महात्मा फुले पूर्णकृती पुतळा चौक स्थापन करून सिग्नल सुरु करण्याचा मागणी साठी धरने आंदोलन केले जाणार माहिती देण्यात आली.
दि. 15 ऑगस्ट च्या जागरूक नागरिक आघाडीच्या बैठकीत जवळपास 140 नागरिकांनी नाव नोंदणी करून बैठकीस हजेरी लावली. ह्या वेळी संतोषआसेगांवकर यांनी प्रास्ताविक केले तर एड.माधुरीताई क्षीरसागर यांनी आघाडीचे उद्देश व कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. सुभाष_बाकळे यांनी आघाडी तर्फे मंगळवार रोजी महापालिकेच्या विरोधात रास्ता रोको व ठिय्या आंदोलना बाबतीत विस्तृत माहीती दिली. प्रहारचे जिल्ह्याध्यक्ष शिवलिंग महादप्पा बोधने यांनी खांद्याशी खांद्या लावून आघाडीच्या ध्येय धोरणा सोबत काम करणार असे सांगीतले तर बैठकीतील चर्चेत माणिक कदम, शिवलिंग बोधने, राजन क्षीरसागर, सुप्रिया कुलकर्णी, हेमाताई रसाळ, संदीप सोळंके, संतोष देशमुख, अॅड लक्ष्मण काळे व इतरांनी सहभाग घेतला. उपस्थित नागरिकांनी आपले विचार मांडले व आघाडी सोबत सक्रिय काम करण्याची तयारी दाखवली.
श्रमिक विश्व न्युज