Home परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याच्या विकासाची आकांक्षा बनलेल्या आंचल गोयल नियुक्तीचे सूतोवाच …

परभणी जिल्ह्याच्या विकासाची आकांक्षा बनलेल्या आंचल गोयल नियुक्तीचे सूतोवाच …

पालकमंत्री नवाब मलिक यांची माहिती.

0
830

परभणी: परभणी जिल्हा अनेक क्षेत्रांचा मागासले पणाचा शिक्का कपाळी घेऊन कित्येक वर्षांपासून विकासाची अपेक्षा ठेऊन रांगेत उभा आहे.निवडणुकांचा निकाली बदलाचा ही फारसा नोंद घेण्यात यावा असा बदल घडला नसल्याने,सामान्य परभणीकर अंतर्मनातील तळापासून विकास व्हावा अशी अपेक्षा करत आला आहे.शाश्वत रोजगाचे प्रश्न असतील,परभणी एम आय डी सी सुधारणा असतील,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल किंव्हा महसूल आयुक्त कार्यालय असेल आशा मागण्या कालांतराने डोके वर काढत आल्या आहेत पण त्यावर महाराष्ट्र राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असेल दखल न घेता परभणी जिल्ह्याचा नागरिकांना केवळ आश्वासना पुढे काही मिळालेले नाहीये.

त्यात परभणी जिल्ह्याला एक कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी मिळणार आणि प्रशासकीय झळमटे बाजूला होऊन जिल्ह्याचा विकासाचा दृष्टीने काही भरीव कार्य होईल अशी अपेक्षा असणाऱ्या तमाम वर्गातील नागरिकांना निर्माण झाली होती परंतु राजकारणी हितसंबंध आडवे आले आणि रुजू होण्यासाठी परभणी येथे येऊन पदभार न स्वीकारता एका महिला अधिकाऱ्याला परत करण्यात आल्याची बाब सर्व स्तरातील लोकांना जिव्हारी लागली आणि स्वाभाविक प्रतिक्रिया त्याचे प्रतिबिंब समाज माध्यमांवर व्यक्त व्हायला लागले.पुढे एक वातावरण बनत शासनाचा विरोधात आंदोलन उभे राहिले आणि यात परभणी,जिंतूर येथील सर्व पक्षीय,संघटनांचा कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी आणि वकील संघाचा वतीनेही प्रशासनाकडे आंदोलने करून निवेदने सुपूर्द करण्यात आली, जिल्हाधिकारी नियुक्ती वरून निर्माण झालेल्या प्रकरणी तीव्र भावना शासनाकडे कळविण्याची विनंती करण्यात आली.पुढे आंदोलने करण्याचा अनुषंगाने तयारी चालवली जात असताना आज दि. ३ रोजी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांचा वतीने पुनश्च श्रीमती आंचल गोयल यांनाच परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहेत.

श्रमिक विश्व न्युज

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here