परभणी – सध्या राज्यभरात महाराष्ट्र राज्य परिहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू असून परभणी जिल्ह्यात हि राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील सर्व डेपोमधील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या अतिशय रास्त असुन त्या मागण्या मान्य होऊन कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे करिता आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट देऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देणारे पत्र देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
राज्य परिहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर केलेल्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील परिवाहनाची जिवन वाहिनी समजल्या जाणान्या महामंडळाच्या बसेस बंद असल्याने सामान्य जनतेला मोठा मानसिक त्रास झाला व आर्थिक फटका बसला आहे. हे आंदोलन असेच सुरु राहिल्यास सामान्य नागरीकांच्या परिवहनाचा प्रश्न निर्माण होणार आहे . करीता या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढावा व या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष परभणी या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांसोबत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडू यांच्याशी या आंदोलनाबाबत फोनवरुन चर्चा करण्यात आली. या मागण्यांवर मा.ना. बच्चुभाऊ कडू स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना दिली.
संबंधीत आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे त्या मागण्या रास्त असून प्रहार जनशक्ती पक्ष, परभणी या आंदोलनास पाठिंबा देत असून राज्य शासनाने यावर त्वरीत तोडगा काढावा असे ही ते म्हणाले.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, मंगेश वाकोडे, नकुल होगे, अरुण कांबळे, राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आंदोलक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
श्रमिक विश्व न्यूज