परभणी : दि.(१६) शहरातील वांगी रोड व कारेगाव रोड साठी चॉकलेट वाटप करून आंदोलन करण्यात आले आहे ,,,मागील अनेक वर्षां पासून वरील नमूद दोन रस्त्यांनी अनेक निरपराध नागरिकांचे बळी घेतले आहेत अनेकांना आपले संसार उध्वस्त झालेले पाहावे लागले आहेत , अपघाताची मालिका सातत्याने सुरूच आहेत ,आणि आता आणखी किती परभणीकर यांना जीव गमवावा लागेलं याचा अंदाज बांधणे कठीण आहे , वारंवार निवेदने मोर्चे आंदोलने करूनही राजकीय सुडा पोटी हा रस्ता नेते मंडळीनी जीवघेणा करून ठेवला आहे असा आरोप करत स्वराज्य इंडिया पक्षाच्या वतीने परभणीकरांना चॉकलेट वाटून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
आशा होती की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी परभणी च्या अंतरंगत रस्त्या साठी कोट्यवधी चा निधी दिला ,ह्या निधी मधून काही तरतूद करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल पण हे न होता नेत्यांनी परभणी वासीयांना चॉकलेट दिले की काय हा प्रश्न सध्या चर्चेचा ठरला आहे , म्हणून विकास न करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात हातात तिरंगा ध्वज घेऊन घाण पाण्यांत अनवाणी चालून नागरीकांना चॉकलेट वाटप करून उपहासात्मक आंदोलन करण्यात आले आहे.
या वेळी स्वराज इंडिया पार्टी चे गोविंद गिरी , रासप चे के के भारसाखळे , सामजिक कार्यकर्ते कलीम भाई , सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सरोदे, सह नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होते ,तर या वेळी मनपा प्रशासनाचा व सत्ताधारी काँग्रेस चा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
#parbhani #Fundamental_rights #choklet
@श्रमिक विश्व न्यूज