परभणी शहर मनपावर सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही,काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुखांनी दिला पक्षाचा राजीनामा.

प्रशासकीय व्यवस्था ही सत्ताधाऱ्यांची तळी उचलण्यात धन्य.

0
602

परभणी : शहरातील विकासाच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या सत्ताधार्यांकडे कोणतेच धोरण नाही,ना भूमिका आहे आणि माझ्यासारख्या मध्यमवर्ग कुटुंबातून येऊन सामान्य नागरिकांचे काम करणार्याना कोंडीत धरून अडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत परभणी शहर महानगरपालिकेचे सदस्य सचिन देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.आज (दि.१६) रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेत नळ जोडणी वाढीव दराला सभागृहात केला होता विरोध.

परभणी शहर महानगरपालिकेच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेत,मनपाच्या वतीने नळ जोडणीचे कार्य आरंभ करतांना एजन्सीकडे काम सुपूर्द करून अवास्तव दर आकारणी करण्यात येणार होती.त्याला सभागृहात विरोध करण्याची आणि शहरातील जनतेच्या वर पडणाऱ्या आर्थिक भुर्दंडला कडाडून विरोध करण्याची भूमिका मनपा सदस्य सचिन देशमुख यांनी घेतली होती.म्हणून सुरुवातीला १४ हजार रुपये निश्चित केलेला प्रति नळ जोडणी दर कमी करून ११ हजार रुपये आणि नंतर तो केवळ दोन हजार दोनशे वर आला होता,त्यामुळे आज अनेक आर्थिक स्थिती बेताची असणारी शहरातील रहिवाशी नळ जोडणी घेऊ शकले आहेत.

परभणी शहरातील व्यापाऱ्यांच्या एल बी टी विरोधी मुद्याला सभागृहात भूमिका मांडून जनतेच्या हिताची व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची बाब सोडवण्याचा प्रयत्न केला,परभणी शहर महानगर पालिकेच्या लाईट बिल घोटाळ्यात गुन्हा नोंद होऊन अद्याप कारवाई करण्यात आलेली नाहीये आणि ७२ लाख रुपयांचा लाईट बिल घोटाळा घडून जनतेच्या पैशाचे हिशोब कोणी विचारात नाहीये ! परभणी शहरातील मोक्याच्या मनपाच्या मालकीच्या जागांवरील आरक्षण उठवण्याचे मोठे षडयंत्र सुरू झाले होते त्याला ही माझ्या वतीने विरोध करून सभागृहात ठरावाला आक्षेप घेण्यात आला.परिणामी हे आरक्षण उठवण्याचे सत्र त्यांना बंद करावे लागले असल्याचे सचिन देशमुख यांनी सांगितले.

शहरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न अनेक वर्षे भिजत ठेवला जातो आहे,सदर बाबतीत प्रशासन ही बघ्याची भूमिका घेत असून धार रोड वरील नियमित प्रवास करणाऱ्या व परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून दुर्गंधीचा आणि आरोग्याचा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत असतांना परभणी शहर महानगरपालिका केवळ कारणे पुढे करून वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचा ही आरोप त्यांनी केला.मला काँग्रेस पक्षाचा काही त्रास नसून परभणी मधील काँग्रेस पक्ष चालवणाऱ्या प्रस्तापितांचा त्रास असल्याचे ते म्हणाले.

परभणी शहर महानगरपालिकेत विरोधी पक्षच राहिला नाहीये.

सत्ताधारी आणि इतर पक्षातील अंतर्विरोध संपुष्टात आला असून परभणी शहर महानगरपालिका मध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले असल्याने मी एकटा विरोधक बनून कार्यरत असल्याचा सचिन देशमुख यांनी ठाम दावा करत म्हणून त्यांना टार्गेट केले जात आहे,जनतेच्या हिताचे व काही झारीतील शुक्राचार्यांचे आर्थिक हित समंध दुखावणारे निर्णय घेण्यास प्रशासनाला बांधील केल्याने त्यांना त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here