Advertisement

परभणी – परभणी शहर महानगर पालिका होऊन जवळपास ९-१० वर्ष होत आहेत परंतु अजुनही महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने परभणी शहरातील नागरीकांना महानगर पालिका दर्जाच्या सुविधा देण्यास शहर महानगर पालिका प्रशासन पुर्णत : अपयशी ठरले असुन फक्त मालमत्तावरील करवाढ या व्यतिरीक्त परभणी शहर महानगर पालिकेत मागील ९-१० वर्षात कुठलाही विकास झालेला नाही.करिता परभणी शहर महानगर पालिकेचा महानगर पालिका दर्जा काढून त्यास परभणी शहर ग्रामपंचायत चा दर्जा द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सदरील निवेदन मा. अंचल गोयल, जिल्हाधिकारी मॅडम परभणी यांच्या मार्फत त्यांची भेट घेऊन पाठवण्यात आले आहे.
परभणी शहरालगत असलेल्या अनेक ग्राम पंचायतीने विविध योजना गावां मध्ये आणुन गावाचा विकास केला आहे. व नागरीकांना चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत. करीता प्रहार जनशक्ती पक्ष परभणी च्या वतीने आपणास नम्रपणे विनंती करण्यात येत आहे मागील १० वर्षाचा परभणी शहर महानगर पालिकेचा कारभार पाहता महानगर पालिका प्रशासन सुविधा देऊ शकेल असे वाटत नाही.


निवेदनात एकूण मुद्दे मांडण्यात आले असून खालील महत्वांच्या कारणाने परभणी शहर महानगर पालिकेचा दर्जा काढुन घेऊन त्याला परभणी शहर ग्रामपंचायत करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.


१. १५ ते २० दिवसात एकदा पिण्याचे पाणी सोडले जाते.


२. मागील १५ वर्षांपासुन परभणीतील सिग्नल व्यवस्था बंद आहे.


३. परभणी शहरातील अंतर्गत रस्ते व शहरालगत असलेल्या वसत्यांमध्ये रस्त्यांची आवस्था अत्यंत बिकट आहे.


४. सिमेंट काँक्रेट व डांबर रस्त्यांवर आजही महानगर पालिका माती मिश्रीत मुरुम खड्डे बुजवण्याचा पराक्रम करीत आहे.


५. शहरामध्ये अद्याप भुमीगत गटार व्यवस्था नाही.


६. शहरामध्ये सार्वजनिक विद्युत लाईट व्यवस्था करण्यात म.न.पा. प्रशासन पुर्णत : अपयशी आहे.


७. शहरातील चार उद्यानांचे अक्षरश : खंडहर झाले करीता लहान मुलांना वे जेष्ठ नागरीकांना खेळण्यासाठी व वॉक साठी उद्यान शिल्लक राहीलेले नाही.


८. ठेल्या द्वारे भाजी किंवा इतर सामानांची विक्री करणा – या ठेलेधारकांसाठी वस्तू विक्रीची वेगळी व्यवस्था नाही.


९. शहरा मध्ये पाकिंगची व्यवस्थाच नाही.


१०. शहरांतर्गत सिटी बस व्यवस्था उभी करण्यास महानगर पालिका प्रशासन पुर्णपणे अपयशी ठरली आहे.


११. शिवाय शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढलेले आहे त्यामुळे शहरामध्ये जागोजागी ट्राफीक जाम होत आहे.


१२. शहरातील मुख्य बाजार पेठांमध्ये महिलांसाठी स्वच्छालयाची व्यवस्था नाही.

शहर महानगर पालिकेला परभणी शहर ग्राम पंचायत म्हणुन जाहिर करावी जेणे करुन परभणीकरांना मुलभुत सुविधा उपलब्ध होतील व मालमत्ता करावरील रक्कम कमी होऊन परभणीकर जनतेस दिलासा मिळेल असे ही निवेदनात म्हंटले आहे निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्ष परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बाळासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मीडिया प्रभारी नकुल होगे, शंकर दामोधर, भगवान घुंबरे, नवनाथ साबळे ईत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

श्रमिक विश्व न्युज

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here