Home आरोग्य परभणी शासकीय स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न १४ वर्षांपासून रडखडलेला !

परभणी शासकीय स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न १४ वर्षांपासून रडखडलेला !

कोरोना महामारीच्या काळात ही अक्षम्य दुर्लक्ष

0
487

परभणी : दि ( २० ) परभणी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयाची मान्यता सन २००६ साली देण्यात आली.१५ वर्षांपासून अधिकचा कालावधी लोटून आध्याप हि स्त्री रुग्णालयाला स्वःताची इमारत भेटू शकलेली नाहीये.कोरोना महामारीच्या प्रार्धुभावाने मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांकडे शासनाचे लक्ष केंद्रित झाले असतांना सुद्धा परभणी जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयाचा बाबत उदासीन धोरण दर रोज २५ ते ३० एवढ्या मोठ्या संख्येने प्रसूती होणाऱ्या शासकीय स्त्री रुग्णालयात विशेषतः सिजर होणाऱ्या महिलांना तोकड्या जागेमुळे एका खाटेवर दोन दोन रुग्णना सुरक्षित अंतर न ठेवता उपचार घ्यावे लागत आहेत.

श्रमिक विश्व फोटो

परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी उभारण्यात आलेल्या शनिवार बाजार,परभणी येथील इमारत अग्नी शामक उपाययोजनांचा उपयुक्ततेचा निकषात मान्यता न भेटल्याने अध्यापपर्यंत जुनीच शासकीय 

जिल्हा रुगणल्यातील स्त्री रुग्ण कक्षाची मोडकळीस आलेली इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने धोकादायक घोषित करण्यात आल्या नंतर हि वापरणे चालू आहे.

परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयाचा इमारती बाबत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान ( NHM ) अंतर्गत बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या दर्गा रोड स्थित इमारत हि २०१८ पासून सुरुवातीचे काही महिने काम रडखडल्या नंतर २०२० पर्यंत बांधकमाने चांगली गती घेतल्याने काम जवळपास पूर्णत्वास आलेले आहे.सदर कामावर आता पर्यंत १४.४० लक्ष येवढा निधी खर्च झाला असून १०० खाटांचे माता व बाल संगोपन दवाखाना प्रस्तावित असलेल्या या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एम सी एच विन्ग इमारतीचे बांधकाम २०२० पासून ८.२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध प्रश्नी रडखडले आहे.बाबत सुधारित निधीची मागणी केंद्राचा आरोग्य विभागाकडे करून हि एक वर्षाचा कालावधी लोटला असल्याचे कळते.

२०२० पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी असतांना सुद्धा केवळ अंतर्गत रस्ते,अग्नी शामक यंत्रणा तथा रंगरंगोटी सारख्या शुल्लक कामांचा वाचून काम पूर्णत्वास जाऊ शकलेले नाहीये,परिणामी परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयाचा इमारतीचा वनवास १४ वर्षांचा कालावधी ओलांडून १५ व्या वर्षात पदार्पण करू पाहत आहे.

श्रमिक विश्व न्यूज

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here