परभणी : स्थानिक प्रवाशी बस सेवा सुरू करा …

जागरूक नागरिक आघाडीच्यावतीने आमदार डॉ.राहुल पाटील यांच्याकडे मागणी.

परभणी ( २३ ) शहरातील लोकसंख्येत झालेली वाढ व दूरपर्यंत वसाहती वाढल्यामुळे सामान्य लोकांना प्रवासी वाहतुकीचे साधन ऑटोरिक्षा शिवाय पर्याय नाही.पेट्रोल-डिझेलच्या भरमसाठ दरवाढीमुळे ऑटोचे दरही वाढले सामान्य जनतेला परवडत नाहीत.

परभणी शहरात मीटर शिवाय ऑटो धावतात, परभणी शहरातील विद्यार्थी मुला मुलींना शिक्षणासाठी कॉलेज,विद्यापीठात जाण्यासाठी ऑटोरिक्षा परवडत नाही व रिक्षाचालक अडवणूक करून मनमानी भाडे आकारत आहेत.बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे स्थानक व स्थानकातून कॉलनी जाण्यापर्यंत मनमानी भाडे वसूल करतात त्यामुळे परभणी येथे दोन मिनी 32 आसनी ग्रीन इलेक्ट्रिकल्स किंवा सीएनजी बस डेंटल कॉलेज ते दत्तधाम व बेलेश्वर महादेव ते ब्राह्मणगाव सुरू करून जनतेला भेडसावणाऱ्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी जागरूक नागरिक आघाडीच्यावतीने आमदार डॉ.राहुल पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here