पीक विमा कंपनीकडे तक्रारी दाखल करण्याचा “शेतकऱ्यांची पोरं” पॅटर्न

0
578

औसा तालुक्यातील तब्बल ७० गावांमध्ये “शेतकऱ्याची पोरं” या संघटनेमार्फत क्रॉप इन्शुरन्स ॲप्लीकेशन व शेतकऱ्यांना ऑनलाइन – ऑफलाइन तक्रारी दाखल करण्यासाठी सहाय्य करण्यात आले होते.

तसेच “शेतकऱ्याची पोरं” संघटनेमार्फत गेल्या १.५ वर्षात क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन, पीक विमा व ऑनलाईन – ऑफलाइन तक्रारी संदर्भात जनजागृती करण्यात आली होती.

एकंदरीतच या टीमच्या उपक्रमाला शेतकरी वर्गाने देखील भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याचाच निकाल म्हणून औसा तालुक्यातून आज पर्यंत तब्बल ५२,५१२ एवढ्या ऑनलाईन तक्रारी, तर ३८,७०० एवढ्या ऑफलाइन तक्रारी दाखल झाल्या.

औसा तालुका तक्रारी दाखल करण्यात अव्वल स्थानावर आहे.

“शेतकऱ्याची पोरं” संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा. गवसाने साहेब यांनी फोनवरून विशेष कौतुक केले.

शेतकऱ्यांनी व त्याच्या पोरांनी तक्रारी दाखल करण्याचे व विमा कंपनीचे सर्व निकष पूर्ण करण्याचे काम केले आहे,आता या तक्रारीनुसार विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे काम हे लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने पाठपुरावा करून पूर्ण करावे, ही मागणी होते आहे.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here