https://youtu.be/WzHnlUkqYHM?si=trRrkXMxGg0QXRVg
पूर्णा ( दि.११) शहरातील क्रांती नगर परिसरात वास्तव्यास असलेले भटके विमुक्त पारधी जमातीचे लोक जे पूर्णा शहरात मागील अनेक वर्षापासून पालात राहतात त्यांच्या कडे स्वतः ची ओळख सांगणारे असे कुठलेच कागदपत्र नव्हते त्यामुळे ती कुटुंब शासनाच्या विविध योजनांमधून तर वंचित होतेच शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पण निर्माण झाला होता अश्या परिस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या कार्याला प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंगभाऊ बोधने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे यांच्या पुढाकाराने या सर्व कुटुंबाला त्यांचे मतदान कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड तयार करण्यात आले.
