मजुरांना साखळदंडांनी बांधून वेठबिगारी,धाराशिव जिल्ह्यात ११ कामगारांची सुटका …

शाश्वत रोजगाराच्या प्रश्नांची वाढती धग कायम.

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाखरवाडी आणि खामसवाडी येथे विहिरीच्या कामासाठी अधिकची मजुरी देतो म्हणून अहमदनगर येथील विशाल नावाच्या एजंट ने संदीप घुकसे आणि भगवान घूकसे या चुलत भावांसह इतर 11 जणांची धाराशिव जिल्ह्यात विक्री केली.तेरा दिवस दररोज पहाटे सहा पासून रात्री सात वाजेपर्यंत विहिरीत दगड फोडण्याचे काम करून घेतले दोन वेळा जेवण आणि रात्री पळून जाऊ नये म्हणून त्यांना जबरदस्तीने दारू पाजून जनावरांप्रमाणे साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले होते.शेवटी एकाने ठेकेदाराच्या तावडीतून पळून जाऊन पोलिसांचे पथक आणले आणि वाखरवाडी आणि खामसवाडी येथे ठेवलेल्या या सर्व 11 जणांची सुटका केली.

लोकसत्ता दैनिकात प्रकाशित बातमीनुसार भूम येतील ठेकेदारासह सात जनाविरुद्ध मानवी तस्करीसह महाराणीचा गुन्हा दाखल झाला आहे.दिवसाकाठी साडेचारशे रुपये मजुरी देण्याचे आम्हीच दाखवून एका ठेकेदाराने मानसी दोन हजार रुपये याप्रमाणे ११ जणांची विक्री केली.दिनांक ३ ते १७ जून असे १४ दिवस दगडफोडीच्या कामाचा अनुभव नसतानाही खामसवाडी येथे पाच आणि वाखरवाडी येथील विहिरीच्या कामासाठी सहा जणांना ठेवण्यात आले.दररोज मरणयातना सोसल्यानंतर विक्री केलेल्या अकरा जणांची दोन्ही ठिकाणाहून आता मुक्तता झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कवठा येथील संदीप रामकिशन घुकसे व त्याचा चुलत भाऊ भगवान अशोक घुकसे २ जून रोजी अहमदनगर येथील रेल्वे स्थानकावर कामाच्या शोधात थांबले होते या ठिकाणी विशाल नावाचा अंदाजे चाळीस वर्षे वय असलेल्या एजंट ने काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना विश्वासात घेतले त्यानंतर दोघांनाही प्रति दिवस साडेचारशे रुपये प्रमाणे काम देतो असे आमिष दाखवले दोघेही बंधू तयार झाले,मात्र एजंट विशाल याने अन्य तिघांनाही असेच आमिष दाखवून सोबत घेतले होते एकूण पाच जणांना रिक्षात बसून खर्डा येथील टोल नाक्यावर पाठवण्यात आले तेथून बळजबरीने एका मोटारी मध्ये बसविले त्यानंतर विशाल नावाचा एजंट भूमी येतील ठेकेदार कृष्णा काळू शिंदे यांच्याकडून प्रति मानसी दोन हजार रुपये घेतले.ठेकेदार कृष्णा शिंदे यांनी तुम्हा सगळ्यांना दोन हजार रुपयात विकत घेतले असल्याने सांगून मोटारीत जबरदस्तीने कोंबून खामसवाडी येथे आणले तेथे पूर्वीच दोघांना दाबून ठेवले होते.

दिनांक १७ जून रोजी पहाटे संदीप यांनी आपल्या आपली कशीबशी सुटका करून चालत चालत सकाळी नऊला ढोकी पोलीस ठाणे गाठले.त्याने घरी संपर्क केला दुपारी दीडच्या सुमारास गावाकडील नातेवाईक वडील चुलत भाऊ आले त्यानंतर कळंब येथील उपविभागी पोलीस अधिकारी एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली वाखरवाडी आणि खामसवाडी येथून दहा जणांची सुटका केली याप्रकरणी संदीप घुकसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ढोकी पोलीस ठाण्यात एजंट विशाल सह भूम येथील ठेकेदार कृष्णा बाळू शिंदे,मैना जाधव,किरण जाधव रणजीत बळीराम साबळे,कृष्णा शिंदे त्याची आई आणि संतोष जाधव या सात जणाविरुद्ध मानवी तस्करी सह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– श्रमिक विश्व न्युज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here