महाराष्ट्रातील धर्मादाय हॉस्पिटल म्हणजेच ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी 20 टक्के खाटा या राखीव असतात.

परभणी जिल्ह्यातील धर्मदाय हॉस्पिटल्स कोणती पहा ...

कुठलंही मोठं आजारपण आलं की भल्याभल्यांची कंबर मोडते. तिथं निर्धन आणि दुर्बल घटकातील कुटुंबांना कोण विचारणार? बऱ्याचदा मग या घटकातील रुग्ण आजाराकडे दुर्लक्ष करतात किंवा कर्जबाजारी होऊन कुणाच्या तरी उपकाराखाली आयुष्यभरासाठी स्वतःला गाडून घेतात. मात्र राज्यातील तब्बल 476 ‘ट्रस्ट हॉस्पिटल’मध्ये निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी 10 हजारांहून अधिक खाटा राखीव असून त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार मिळणं सहजशक्य आहे. त्यासाठी केवळ दारिद्रयरेषे खाली असल्याचे पिवळे रेशनकार्ड  किंवा तहसीलदारांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील धर्मादाय हॉस्पिटल म्हणजेच ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी 20 टक्के खाटा या राखीव असतात. त्यापैकी 10 टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी  मोफत तर 10 टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात असतात. राज्यात असे एकूण 476 हॉस्पिटल  आहेत आणि तब्बल 10, 447 खाटा या त्यांच्यासाठी राखीव आहेत. राखीव ठेवलेल्या या खाटा आणि उपचार हा या गरीब-निर्धन रुग्णांचा  हक्क आहे. जिथं कुणाकडून ही शिफारस न घेतासन्मानानं उपचार घेऊ शकतात. विशेष म्हणजे धर्मादाय आयुक्तालयाच्या https://charity.maharashtra.gov.in/mr-in/ या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध असते. प्रत्येक जिल्हयानुसार तिथल्या ट्रस्ट हॉस्पिटलची यादी आणि उपलब्ध असणाऱ्या खाटांची संख्या पाहता येते. तसेच संबंधित जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांचे संपर्क दिलेले असतात. काहीही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांना संपर्क करता येऊ शकतो.
·       राज्यात 476 धर्मादाय / ट्रस्ट हॉस्पिटल
·       निर्धन व गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा – 10, 447 खाटा
·       निर्धन रुग्णांसाठी मोफत उपलब्ध 10 टक्के खाटा – 5354
·       गरीब रुग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध 10 टक्के खाटा – 5093

कशी मिळेल माहिती?

https://charity.maharashtra.gov.in/mr-in/आहेत, याची माहिती प्रत्येक ट्रस्टहॉस्पिटलने दररोज अपडेट करणे आवश्यक वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर मुखपृष्ठ पान येते. या पानावर ‘बेड उपलब्धता पहा’ यावर क्लिक करावे. त्यानंतरच्या पानावर आपला जिल्हा निवडा आणि ‘शोध’ टॅबवर क्लिक केल्यास रुग्णालयाची यादी दिसेल. आपल्याला आवश्यक असणाऱ्या हॉस्पिटलच्या नावापुढील ‘बेड उपलब्धता’ टॅबवर क्लिक केल्यावर मोफत व सवलतीच्या दरात उपलब्ध असणाऱ्या बेडची संख्या दिसेल.

निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्ण कोणाला म्हणायचे? आणि त्यांच्यासाठी शासनयोजना काय ?

निर्धन रुग्ण

  • उत्पन्न मर्यादा – वार्षिक 85 हजार रुपये
  • पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचार
  • 10 टक्के राखीव जागा

दुर्बल घटकातील/गरीब रुग्ण

  • उत्पन्न मर्यादा – वार्षिक 1 लाख 80 हजार रुपये
  • सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार (50 टक्के सवलत)
  • 10 टक्के राखीव जागा

माहीती अपडेट होत नाही!

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गरीब-निर्धन रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरणारी ही योजना  लागू करण्यात आलेलीआहे. त्यानुसार वेबसाईटवर एकूण खाटांपैकी किती खाटा उपलब्ध आहे. मात्र बहुतांश हॉस्पिटल याबाबत उदासीन आहेत. एकूण खाटांची संख्या वेबसाईटवर दिसत असली, तरीही त्यातील किती खाटा शिल्लक आहेत याची माहिती आद्ययावत करत नाहीत. दर दिवशी ही माहिती अपडेट झाली तर ऐनवेळी रुग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची होणारी फरफट टाळता येऊ शकते.

District

Total Hospitals

निराधार आणि निर्धन रुग्णांसाठीएकूण राखीव मोफत खाटा

गरीब आणि दुर्बल घटकातीलरुग्णांसाठी अल्प दरात एकूण राखीव खाटा (बिलात 50 % रक्कमेची सवलत)

हॉस्पिटलमधील एकूणराखीव खाटा

Latur99090180
Akola115051101
Buldhana47714
Bhandara2437
Chandrapur4252550
Gadchiroli36612
Gondia2131326
Nagpur32336334670
Amravati139898196
Wardha8514314828
Washim2151530
Yavatmal3353570
Total4765354509310447

 

DistrictTotal Hospitals निराधार आणि निर्धन रुग्णांसाठीएकूण राखीव मोफत खाटागरीब आणि दुर्बल घटकातीलरुग्णांसाठी अल्प दरात एकूण राखीव खाटा (बिलात 50 % रक्कमेची सवलत)हॉस्पिटलमधील एकूणराखीव खाटा
A. Nagar26376376752
Nandurbar2101020
Jalgaon87272144
Dhule88787174
Nashik15224224448
Aurangabad18176170346
Jalna2212142
Parbhani59918
Hingoli0000
Nanded4808
Pune6410229631985
Ratnagiri55656112
Raigarh108585170
Sindhudurg7262652
Mumbai385075071014
Mumbai Suburban 49375375750
Thane34318319637
Palghar1000
Kolhapur21190191381
Sangli29311323634
Satara15121121242
Solapur18162162324
Beed3000
Osmanabad15510

श्रमिक विश्व न्यूज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here