महाराष्ट्रात आज मंगळवार पासून आशा वर्कर्स संपावर !! श्रमिक विश्व न्यूज

    0
    453

    श्रमिक विश्व न्युज

    मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी परभणीत लाक्षणिक संप …

    कोरोना काळातही आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आशा वर्कर्स ( मान्यता प्राप्त सामाजिक स्वास्थ कार्यकर्ता ) आज दि. १५ मंगळवार पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत.

    महाराष्ट्रव्यापी संपाच्या परिणामी निश्चित स्वरूपात ग्रामीण तथा दुर्गम भागातील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    महाराष्ट्र राज्यात जवळपास ७० हजार पेक्षा अधिक आशा कार्यकर्ती आणि चार हजार गट प्रवर्तक यांनी कोविड केंद्रांसह अन्य सार्वजनिक आरोग्य केंद्रांवर यथाशक्य कार्य बजावली आहेत.

    आशा वर्कर्स यांचा सह गट प्रवर्तकांची प्रामुख्याने विद्यमान पाच हजार रुपये असलेले शासकीय मानधन वाढवून आठरा हजार रुपये करण्याची मागणी आहे.

    परभणी येथे आयटक सलग्न आशा वर्कर्स युनियनच्या वतीने राज्यव्यापी संपात सक्रिय सहभाग नोंदवत,एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.कॉ. मुगाजी बुरुड यांचा नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलना नंतर जिल्हाधिकारी,परभणी यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले.प्रसंगी बहुसंख्य आशा कार्यकर्तींची उपस्थिती होत्या.

    सचिन देशपांडे,
    श्रमिक विश्व न्यूज,परभणी.

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here