महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनचा तिसरा वर्धापन दिन संपन्न …

बांधकाम कामगारांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवण्या सह समस्यांचा उहापोह

shramikvishwa.com
बांधकाम कामगार सभा संपन्न

पुणे (दि.०१ ऑगस्ट) महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. ही सभा पद्मावती सांस्कृतिक सभागृह अप्पर बिबेवाडी येथे झाली. जाहीर सभेच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक साथी पवन यांनी केले. आपल्या प्रस्ताविकेत साथी पवन यांनी मागच्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियन बांधकाम कामगारांना संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी दिलेल्या लढ्यांचा अहवाल मांडला.

अनेक कामगाराच्या नोंदणी करण्यात, ठेकेदारांनी किंवा बिल्डरांनी बुडवलेली मजुरी मिळवून देण्यासाठी, कामगाराच्या मुलांना आणि मुलींना शैक्षणिक लाभ मिळवून देण्यासाठी, कामाच्या ठिकाणी कामगाराच्या अपघाताच्या संदर्भातील घटनांच्या मुद्यावरील आंदोलने, दलित व महिला कामगारांविरोधातील जातीय व लैंगिक अत्याचाराविरोधातील आंदोलने, इतर कामगार संघटनांच्या आंदोलनांना दिलेली साथ, असा सर्व आढावा त्यांनी मांडला.

महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनचे सल्लागार साथी अभिजित यांनी इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या मोठ्या प्रमाणात होत असलेला भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला आणि सरकारची कामगारांच्या जीवनाप्रती असलेली असंवेदनशीलता उघड केली. बांधकाम कामगारांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे, आणि साक्षरता वर्गाकरिता युनियनने पुढाकार घेतला पाहिजे असे त्यांनी मांडले.

समारंभाचे समारोपाचे भाषण साथी परमेश्वर जाधव यांचे झाले. पुढील एक वर्षांमध्ये युनियन प्रामुख्याने शासनाचे केंद्रातील आणि राज्यातील शासनाचे बदललेले कामगार विरोधी धोरण आणि कामगार वर्गावर होत असलेले राज्यसत्तेचे हल्ले यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग बेरोजगारीने, उपासमारी त्रस्त आहे. नाक्यावर कामगारांना जागा मिळाली पाहिजे ,पिण्याची पाण्याची सुविधा किंवा सार्वजनिक शौचालय निर्माण झाले पाहिजे, कामगारांसाठी फिरती ग्रंथालय चालू करणे, साक्षरता वर्ग चालू करणे हे सर्व उपक्रम कामगार वर्गांसाठी या पुढील वर्षांमध्ये युनियन राबवेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन साथी प्रवीण एकडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या दरम्यान इन्कलाब जिंदाबाद, कामगार वर्गीय एकता जिंदाबाद, जगातील कामगारांनो एक व्हा, सर्वांना रोजगार मिळालाच पाहिजे, शासनाने नाक्यावर एक्सचेंज लेबर ऑफिस स्थापन केलेच पाहिजे, कामगाराच्या नोंदण्या नाक्यावर येऊन सरकारने केल्याच पाहिजेत, या घोषणा देण्यात आले .

श्रमिक विश्व 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here