
परभणी : (दि.१७) गरोदर व बाळंतपणात महिलांना आरोग्य सेवा सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे आणि माता बाल आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला परभणी शहरात शहर महानगरपालिका,नागरी आरोग्य विभाग तथा एकात्मिक बालविकास विभागाच्या समन्वयाच्या अभावाने दिरंगाईचे ग्रहण लागले आहे. योजनेच्या निकषात येणाऱ्या महिलांना गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर ही लाभ मिळण्यास मोठा विलंब लागत आहे,पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षणातून समोर आलेल्या 15 ते 49 वयोगटातील 57% स्त्रिया अशक्त असल्याचा अहवालानुसार शहरातील गरोदर महिलांची नोंदणी व आरोग्य सेवा सुविधांबाबत गंभीर त्रुटी असल्याच्या शक्यतेने कुपोषणाच्या स्थितीशी उपाययोजना करण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत
भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मातृवंदना व जननी सुरक्षा योजनेची परभणी शहरात,शहर महानगरपालिका नागरी आरोग्य विभाग तथा शहरी एकात्मिक बाल विकास विभाग यांच्यातील योग्य समन्वयाच्या अभावामुळे नगरी भागातील विशेषतः स्लम भागातील गरोदरपणात आणि प्रसूती झालेल्या महिलांना आरोग्य सेवा,सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करण्याच्या, माता व बाल आरोग्य सुधारण्याच्या कार्यक्रमाला क्षती निर्माण होते आहे.
