मोबाईल पत्रकारितेचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न …
औरंगाबाद येथील एम जी एम विद्यापीठात पत्रकारिता महाविद्यालय व डिजिटल मिडिया एडिटर असोसिअशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि १६ व १७ सप्टेंबर रोजी मोबाईल पत्रकारिता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .पत्रकार तथा मोजो ट्रेनर प्रतिभा चंद्रन यांच्या कडून मोबाईल वर विविध अप्लिकेशनच्या साह्याने यु ट्युबर स्वतंत्ररीत्या पत्रकरिता करणाऱ्या महाराष्ट्र भरातून आलेल्या सहभागी सदस्य,विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.