राष्ट्रप्रेमी असणे म्हणजेच सार्वजनिक क्षेत्राचे समर्थक असणे, सार्वजनिक क्षेत्रे टिकण्यासाठी झगडणे !

फोटो गुगल साभार

जागतिक पातळीवर आर्थिक, लष्करी, राजनैतिक संदर्भ वेगाने बदलत आहेत.

सार्वजनिक विरुद्ध खाजगी क्षेत्राच्या चर्चा डाव्या विरुद्ध उजव्या विचारसरणीच्या अभिनिवेशात लढवल्या गेल्या हे दुर्दैव

डाव्या आणि उजव्याच्या मध्यभागी खूप मोठा भूभाग आहे त्यावर येऊ या !


ज्यावेळी आंतराराष्ट्रीय ताणतणाव तयार होतात, युद्धसदृश्य परिस्थिती तयार होते

तेव्हा राष्ट्राच्या आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करणे, देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे नेहमीप्रमाणे चालतील हे बघणे हे सगळ्यात महत्वाचे कार्य असते

अशावेळी अर्थव्यवस्थेसाठी मोक्याच्या क्षेत्रात सार्वजनिक मालकी असणारे तगडे उपक्रम अस्तित्वात असणे सर्वात कळीचे असते.

कारण आग लागली आहे म्हणून या विहिरी एका रात्रीत खोदता येत नाहीत.


काही उदाहरणावरून हा मुद्दा समजून घेऊ या

(१) खनिज तेल / पेट्रोलियम पदार्थांची सुरक्षितता: त्यावर नियंत्रण नसेल तर अर्थव्यवस्थेतील रेल्वे व रस्ते वाहतूक आणि म्हणून अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते.

फोटो गुगल साभार

(२) दूरसंचार क्षेत्रातील सर्व्हर कोठे आहेत / त्यावर कोणाचे नियंत्रण ? डेटा लोकलायझेशनचा मुद्दा आता शांततेच्या काळात एव्हढा तापतो तर युद्ध काळात ?

(३) देशातील विमानतळ कोणाच्या मालकीचे? देशातील विमाने कोणाच्या मालकीचे ?

(४) देशातील बंदरे / देशाची आयात, निर्यात सांभाळणारी जहाजे कोणच्या मालकीची ?

(५) देशाच्या अर्थव्यस्वस्थेत रक्ताभिसरण करणारे बँकिंग क्षेत्रात सार्वजनिक मालकी पुरेशी आहे कि नाही ?

(६) देशाची अन्नसुरक्षा. देशांतर्गत अन्नधान, डाळी, तेलबिया यांचे मुबलक उत्पादन, त्यासाठी तरी शेतकरी तगला पाहिजे. त्यासाठी अन्नसाठे सांभाळणारी फूड कॉर्पोरेशन पाहिजे

हि फक्त वानगीदाखल यादी आहे. अशी भली मोठी यादी करता येईल.


सार्वजनिक क्षेत्राचे समर्थन, सार्वजनिक क्षेत्रे टिकण्यासाठी झगडणे हा राष्ट्रप्रेमाचा एक अविष्कार आहे हे मध्यमवर्गातील प्रोफेशनल्स, विशेषतः तरुण प्रोफेशनल्स, तंत्रज्ञ, व्यवस्थापक यांनी समजून घेतले पाहिजे.

आपली ऊर्जा सार्वजनिक क्षेत्राला बदनाम करण्यासाठी न घालवता.

सार्वजनिक क्षेत्रे अधिक कार्यक्षम, कमी भ्रष्टाचार असणारी, अधिक रसरसलेली कशी होतील यासाठी वापरण्याची गरज आहे.

संजीव चांदोरकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here