लेबर काँट्रॅक्टिंगच्या थरावर थर रचनेत , प्रत्येक पुढचा थर कमी कमी मार्जिन्सवर काम करतो …

संजीव चांदोरकर

मुंबई समुद्रातील P-३०५ दुर्घटना ;

लेबर काँट्रॅक्टिंगच्या थरावर थर रचनेत , प्रत्येक पुढचा थर कमी कमी मार्जिन्सवर काम करतो ; आणि त्या प्रमाणात मानवी श्रमाचे मूल्य कमी लेखले जाते हे सत्य आहे !

कोरोना असू दे कि तौक्ते ; त्यांचा उगम निसर्गातील प्रक्रियांशी आहे मान्य ; पण त्यात किती माणसे मरणार , किती जण नरक यातना भोगणार हे त्या देशातील राजकीय अर्थव्यवस्था ठरवत असते

मग कोरोनाच्या संबंधात ती आरोग्य क्षेत्राशी संबंधित असते ; मुंबईच्या समुद्रातील तेल उत्खनन क्षेत्रात ७५ माणसे मेली याचा संबंध कामगार कायद्यांशी आहे.

फोटो गुगल साभार

ONGC म्हणते त्या दुर्घटनेशी आमचा प्रत्यक्ष संबंध नाही आम्ही अफकॉन्सला नेमले होते
Afcons म्हणते आमचा प्रत्यक्ष संबंध नाही त्या प्लॅटफॉर्मच्या मालक कंपनी असलेल्या Durmast कंपनीशी आहे
Durmast म्हणते त्या प्लॅटफॉर्मचा Captain दोषी आहे

आणि शासन म्हणणार प्रचलित कायद्यानुसार कारवाई होईल

पण शासन आणि राजकीय नेते हे सांगत नाहीत कि प्रचलित कामगार कायदे म्हणजे काही गुरुतवकर्षणाचे नियम नाहीत ज्यात आपण काहीच बदल करू शकत नाहीत ;

ते पूर्णपणे तुम्ही म्हणजे राजकीय प्रक्रियेने बनले आहेत


कॉर्पोरेट भांडवलाचा नवउदारमतवाद घाबरतो मानवी श्रमांना ;

त्यातून रिस्क मॅनेजमेंटच्या नावाखाली , स्पर्धेला तोंड देण्याच्या नावाखाली , वेतन पातळी दाबून ठेवता यावी म्हणून काँट्रॅक्ट लेबर्स ची सुरुवात झाली ; ट्रेड युनियन्स दंडसत्ता वापरून नेस्तनाबूत केल्या गेल्या

या सगळ्या गोष्टींना कायद्याची चौकट पुरवली गेली

पण दहीहंडीला जसे थर असतात तसे लेबर कॉन्ट्रॅक्टर मधून सब कॉन्ट्रॅक्टर , सब सब काँट्रॅक्टर्स आले ;

यातून प्रत्येक पायरी आपले भरघोस कमिशन काढतंच पण जबाबदारी फिक्स करायच्या वेळी एकमेकांकडे बोट दाखवण्याची सोया देखील तयार होते


P-३०५ च्या प्लॅटफॉर्मच्या कप्तानाने आपला प्लॅटफॉर्म वादळाच्या केंद्रबिंदूपासून १२० नॉटिकल मैलांवर ठेवण्याचा निर्णय घेतला

का घेतला ? पेपरातील बातम्यांप्रमाणे कार्यक्षेत्रापासून खूप दूर अजून सुरक्षित स्थळी प्लँटफॉर्म नेला असता तर तो परत पूर्व ठिकाणी घेऊन जा , पुन्हा काम सुरु करा यात ५-६ दिवस अनुत्पादक म्हणून फुकट गेले असते

त्या प्रमाणात कम्पनीच्या प्रॉफिट मार्जिन्स कमी झाल्या असत्या , याचे दडपण त्या कप्तानाच्या निर्णयात नव्हते असे म्हणता येईल का ?

लेबर काँट्रॅक्टिंगच्या थरावर थर रचनेत , प्रत्येक पुढचा थर कमी कमी मार्जिन्सवर काम करतो ; आणि त्या प्रमाणात मानवी श्रमाचे मूल्य कमी लेखले जाते हे सत्य आहे

वादळाची तीव्रता , त्याचा केंद्रबिंदू सरकणे याचे मोजमाप करण्यासाठी लागणारी तांत्रिक ज्ञान त्याच्याकडे असते का ?


मानवी श्रमाला / मानवी जीवनाला अतिशय कमी लेखनाच्या राजकीय आर्थिक तत्वज्ञानात याची मुळे जाऊन भिडतात

या सगळ्यात केंद्रस्थानी शासन आहे ; By omission or commission. नुकसानभरपाई साठी नाही तर सगळ्याचे मूळ कामगार कायद्यात आहे म्हणून

संजीव चांदोरकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here