शहरातील गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहनांचा मुक्त संचार, वाहतूक कोंडी सह नागरिकांचा जीव धोक्यात …

एकमेकांकडे बोट करून यंत्रणांचे कानावर हात

गंगाखेड नाका परिसरात अवजड वाहनांचा धोकादायक टर्न
गंगाखेड नाका परिसरात अवजड वाहनांचा धोकादायक टर्न
शहरात वर्दळीच्या ठिकाणी
शहरात वर्दळीच्या ठिकाणी अवजड वाहनांचा धोकादायक शिरकाव.

परभणी : (दि.२१) शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अवजड वाहनांच्या मुक्त संचाराने नागरीकांच्या समोर वाहतूक कोंडी यासह गंभीर अपघाताचे संकट उभे टाकल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे नित्य चित्र असताना त्यात अवजड वाहनांच्या गर्दीतून होणाऱ्या वाहतुकीने कधीही अपघात होण्याची शक्यता अधिक प्रमाणत बळावली आहे.

परभणी शहरातील अतिक्रमणाने अत्यंत अंकुचीत पावलेल्या गंगाखेड नाका,परळी रेल्वे क्रॉसिंग गेट परिसरात शहर महानगरपालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण कक्षाच्या दुर्लक्षामुळे भागातील नागरीक अक्षरशः जीव मुठीत घेऊन वावरत असल्याचे भयाण चित्र आहे.

शहरी वाहतूक व्यवस्थापन व्यवस्था कोलमडली असून प्रसंगी सर्वसामान्य नागरिकांना टोकाचा मनःस्ताप सहन करण्यापलीकडे काही उरले नसल्याचे हे घोतक आहे,अत्यंत दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली शहर मनपा प्रशासनाला दिसून येत नसून,त्यात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्ते अडवले गेले आहेत त्यातून वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.परभणी शहर वाहतूक नियंत्रण कक्षाच्या हडेलहप्पी कार्यपद्धतीचा फटका शहरातील प्रत्येक चौकात लोक घेत असून,हे सगळे कमी म्हणून की काय अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीने त्यात कळस गाठला आहे.

परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेट भागात अवजड वाहनांचा अत्यंत धोकादायक असा वळण रस्ता कधीही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतू शकते त्याचे कोणतेच गांभीर्य परभणी उपप्रादेशिक परिवहन विभागाला नसून त्यात सर्रास नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून अवजड वाहनांकडे कानाडोळा केला जातो आहे.

केवळ रस्ते सुरक्षा समिती नावालाच.

एकमेकांकडे बोट करून स्वतःची संपूर्ण जबाबदारी झटकून टाकण्याची पद्धती परभणी शहर महानगरपालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण विभागाने वापरली असून त्यात नागरिकांच्या जीवावर सुद्धा बेतू शकते याचे गांभीर्य मात्र राहिले नाहीये.

सचिन देशपांडे,

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here