शाश्वत नौकरीच्या अपेक्षेने दुहेरी पिळवणूक ….

102 कंत्राटी रुग्णवाहिका ड्रायव्हर व सफाई महिला कामगारांचे थकीत वेतनासाठी उपोषण.

परभणी.[ ३० ] 102 रुग्णवाहिका कंत्राटी ड्रायव्हर व सफाई कामगारांचे थकीत वेतनासाठी परभणी येथे उपोषण आरंभ. परभणी जिल्ह्याला शाश्वत रोजगाराच्या वणव्याचा शाप आहे.सरकारी कंत्राटीकरण आणि बेरोजगारीच्या भीषण संकटांचा सामना करणारा तरुण ,महिला वर्ग यांच्या संकटात संधी शोधणारे काही कमी नाहीयेत .परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय तथा तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालयात 102 रुग्नावाहीकेवर कंत्राटी नौकरीच्या अपेक्षेने हजारो रुपये भरून रुजू झालेल्या व मागच्या चार पाच महिन्यांपासून किमान वितान सुद्धा न भेटता कामावरून कमी करण्यात आलेल्या ड्रायव्हर व सफाई कामगारांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले प्रश्न उपस्थित करून आमरण उपोषणास दि.३० ऑगष्ट पासून प्रारंभ केला आहे .

श्रमिक विश्व न्यूज

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here