Home परभणी जिल्हा शिक्षण हक्क कायद्याची परभणी मध्ये पायमल्ली,प्रवेश प्रक्रियेत लाचेची मागणी एकास अटक.

शिक्षण हक्क कायद्याची परभणी मध्ये पायमल्ली,प्रवेश प्रक्रियेत लाचेची मागणी एकास अटक.

या वर्षी ३५ हजार पेक्षा अधिक जागा राहणार रिक्त

RTE #RTEAdmission #education #parbhani

परभणी : ( ११ ) महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशांसाठी दोन वेळेस मुद्दतवाढ देऊन ही अद्याप ३५ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

द राईट ऑफ चिल्ड्रेन टू फ्रि अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट २००९ च्या कायद्याची प्रत्येक्ष जमिनीवरील अमलबजावणी मात्र वेगळेच कारण असल्याचे सांगून जात आहे.परभणी मध्ये काही पालकांना प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने मुलांच्या प्रवेश निश्चिती करिता ३० हजार रुपये प्रति विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मागणी करण्याची बाब ६ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत समोर आली.

शासन निर्देशानुसार आर टी इ ( RTE ) प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे ठरविल्या नंतर प्रवेश नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कुठे भेटीची या आवश्यकता नसताना,परभणी मध्ये गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने समांतर व्यवस्था निर्माण करून प्रवेश नोंदीतांना शाळेत पाठवण्याची पद्धती रुजवण्याचा प्रकार चालू होता.प्रवेश दिनांकाच्या शेवटच्या दिवशी पर्यंत पालकांना झुलवत ठेवत त्यांच्याकडून लाचेची मागणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

‎@श्रमिक विश्व 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here