श्रीमती आँचल गोयल यांना का रूजू करून घेतले नाही ?

"जागरूक नागरिक आघाडी"परभणीच्या वतीने ०२ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक" !

0
1349

परभणी जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी, श्री. मुंगळीकर दि. 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आणि त्यांच्या जागी कोण येणार याची उत्सुकता सर्वसामान्यांना होती. तेवढ्यात बातमी धडकली की महिला आय.ए.एस.आधिकारी, श्रीमती आँचल गोयल, ह्या परभणी जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार व त्यांचा फोटो ही सर्व वर्तमानपत्रात झळकला. त्या चार दिवस अगोदर परभणीला आल्याच्या बातम्या देखील प्रसारित झाल्याच होत्या. काल दुपापर्यंत त्या पदभार घेणार असेच सर्वसामान्यांना वाटत होते. परंतु काल दुपारनंतर अचानक कळाले की श्री मुंगळीकर यांनी राज्य शासनाचे आदेशावरून मा. अतिरिक्‍त जिल्हाधिकारी यांचेकडे पदभार सोपविला.


श्रीमती आँचल गोयल यांना का रूजू करून घेतले नाही? त्या रूजू झाल्या तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते? हे सर्व सामान्य जनतेला कळालेच पाहिजे.


परभणीतील पत्रकारिता फक्त जनतेमध्ये धुसर व संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यापुरतीच चालू आहे की काय? शोध पत्रकारिता करणे, सर्वसामन्यांसमोर वास्तव येवू देण्याऐवजी फक्त आपसात चवीने चर्चा करण्यासाठी तसेच कोणालाच दुखवायचे नाही, डोळ्यात यायचे नाही याच भूमिकेत असेल तर आता मात्र सर्वसामान्य जनतेने राज्य शासनाला जाब विचारणे गरजेचे आहे.
एक महिला आय. ए. एस आधिकारी तिचे सात आठ महिन्याचे लेकरू घेवून पदभार घेण्यासाठी येते आणि सर्व प्रस्थापित पक्षीय नेते मंडळी साटेलोटे असणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून ती महिला पदभार कसा घेणार नाही यासाठी वरिष्ठस्तरावरून डावपेच करतात ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे. शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या बाता किती पोकळ व फसव्या आहेत हे अनेकदा उघड झालेच आहे.
कालच्या या नाट्यमय घटनेबाबत सर्व सामान्य जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. सर्वात वाईट म्हणजे पुरोगामी व महाविकासाचे नाव घेणारे राज्य शासन परभणीतील अशा नेते मंडळी व आधिकाऱ्यांपुढे नांगी टाकत असेल तर ती सर्वात निषेधार्ह बाब आहे.


एड माधुरी क्षीरसागर यांच्या फेसबूक पेेेेेजवर आव्हान केल्यानुसार उद्या दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी राज्य शासनाच्या निषेध करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी सकाळी 11.00 वा शिवाजी पुतळ्याजवळ एकत्र जमावे. “जागरूक नागरिक आघाडी” यांचे वतीने राज्य शासनाच्या निषेधाचा ठराव करून निदर्शने करण्यात येतील असे नमूद केले आहे.
त्यानंतर मा मुख्यमंत्री यांना ठराव व निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत पाठविण्यात येईल. नागरिकांनी
जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जागरूक नागरिक आघाडीच्या वतीने एडवोकेट माधुरी क्षीरसागर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट वर केले आहे.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here