साखला प्लॉट,भिमनगर रेल्वे फाटकावर भुयारी मार्ग करा …

सह्याद्री फाऊंडेशनचे राज्यपालांना साकडे.

0
1117

परभणी शहरातील साखला प्‍लॉट व भीम नगर भागातील वस्तीसाठी रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग मंजुरी करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री फाऊंडेशन,परभणी च्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे. परभणी शहरातील साखला प्‍लॉट,भीम नगर येथील रहदारीची वर्दळ असणाऱ्या मुख्य मार्गावर रेल्वे क्रॉसिंग आहे. अंदाजे दोन लाख लोकवस्ती असलेल्या वस्ती मधील नागरिकांना सदर मार्गाचा रहदारी करिता दररोज उपयोग करावा लागतो.

श्रमिक विश्व न्युज

रेल्वे फाटक 24 तासात 36 वेळा बंद होते त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांचे व रुग्णांचे अतोनात हाल होतात. दिरंगाईमुळे बऱ्याच रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे स्थानिक प्रशासन, रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधीं यांच्याकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही काही उपयोग झाला नाही. म्हणून सदर प्रकरणाबाबत राज्यपाल महोदयांनी प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा दृष्टीने समंधितांना सूचना कराव्यात व परभणीकरांच्या हाल-अपेष्टा थांबवल्या अशी मागणी सह्याद्री फाऊंडेशनच्या सुधीर साळवे यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here