परभणी : शहरातील रेल्वे स्टेशन तथा मध्यवर्ती बसस्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रभाग क्रमांक १६ साखला प्लॉट,लोहगाव रोड आणि ज्ञानेश्वर नगर व आता मागच्या काही वर्षांपासून लोहगाव रोड वरील ३३ के व्ही केंद्र परिसरात गुंठावरी विक्री करून निर्माण झालेली नव वसाहत येथील नागरिकांना परळी कडे रेल्वे मार्गवर असलेल्या क्रॉसिंगचा मागचा ५० वर्षांचा मनस्ताप काही केल्या संपताने दिसत नाहीये.
राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील निर्माण करण्यात आलेल्या परभणीतील एकमेव उड्डाणपुलाच्या निर्मिती नंतर साखला प्लॉट,ज्ञानेश्वर नगर प्रभागातील नागरिकांनी तीव्र आक्षेप घेऊन ही कोणत्या ही पक्षाच्या नेत्यांनी,लोकप्रतिनिधींनी सहाय भूमिका घेतली नव्हती,परिणामी उड्डाणपुलाच्या मध्ये साखला प्लॉट भागातील नागरिकांना मुख्य बाजार पेठेत जाण्यासाठी काही मार्ग उपलब्ध करून देण्यात आला नाही.वर्षानुवर्षे साखला प्लॉट,ज्ञानेश्वर नगर तथा प्रभागातील नागरिक रेल्वेच्या दोन्ही क्रॉसिंग मध्ये अडकून मनस्ताप सहन करत आली आहेत,पण याचे काही सोयरसुतक प्रभागातील लोकप्रतिनिधींना सुद्धा नसल्याचे चित्र आहे.
गंभीर रुग्ण व शाळेकरी मुलं सोसतायेत यातना.
गंगाखेड नाका आणि लोहगाव मार्गावरून जाणारा मार्ग तालुक्यातील अनेक गावांना दळण-वळणाचा प्रमुख मार्ग आहे.मार्गावरून एस टी महामंडळाच्या बस सह अनेक खाजगी वाहने या मार्गावरून शहरात दाखल होत असतात.प्रसंगी गंभीर आजाराच्या रुग्णाला शहरात दाखल होण्याआधी परळी रेल्वे क्रॉसिंग ओलांडून जावे लागते आणि अनेक वेळा गेट बंद असल्याने मोठी कसरत आप्तजनांना करतांना पहावयास मिळते.परळी गेटच्या निमुळत्या आखूड जागेतून जातांना गेट उघडल्या नंतर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने रहदारीची कोंडी होणे नित्याचे झाले आहे.या कोंडीतून मार्ग काढणे शाळेकरी मुलांना अनेक वेळा जिकरीचे झाले आहे.परळी रेल्वे गेट पासून गंगाखेड नाका भागात जाते वेळी संपूर्ण रस्त्यावर अस्तव्यस्त प्रकारे लावण्यात आलेली वाहने आणि दोन्ही बाजूने वाढलेले अतिक्रमण या मुळे रहदारीची कोंडी होत असून,बाबत कधी परभणी शहर मनपा आणि सदर भाग अख्यारीतीत येणारी कोतवाली पोलिसांनी यावर उपाययोजना अमलात आणली नाहीये.
झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि वाहनांची संख्या पाहता साखला प्लॉट भागातील परळी रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग निर्माण करून नागरिकांना रोजच्या मनस्तापातून मुक्त करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने मागचे अनेक वर्षे करण्यात येते आहे.
श्रमिक विश्व न्यूज