![](https://www.shramikvishwa.com/wp-content/uploads/2023/01/images_1672631661056-300x225.jpeg)
सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी जवळ शिराळा येथे फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.सुमारे तासभरने पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा दुर्घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप मदतीसाठी धावून आलेल्या स्थानिक तरुणांनी केला.लोकसत्ता दैनिकात प्रकाशित बातमीनुसार बार्शी आणि शेजारच्या मराठवाडा भागातील उस्मानाबाद,बीडमध्ये फटाक्यांचे अनेक कारखाने आहेत मराठवाडा सीमेवर असलेल्या पांगरी पासून जवळ असलेल्या शिराळा गावच्या शिवारात माळराणावर हा फटाक्यांचा कारखाना आहे.रविवारी दुपारी कामगार काम करत असताना कारखान्यात शोभेच्या दारूचा स्फोट झाला. स्पोट इतका भीषण होता की काही किलोमीटरचा परिसर हादरला.
श्रमिक विश्व न्युज