परभणीतील उपोषण मैदानाच्या दुरुस्तीची मागणी …

    स्वराज इंडिया जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


    परभणी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील उपोषण मैदानाची तात्काळ दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्वराज इंडिया परभणीचे जिल्हाध्यक्ष गोविंद उत्तमराव गिरी यांनी केली आहे.

    सध्याच्या घडीला हे मैदान पूर्णपणे चिखलमय व घाणेरड्या अवस्थेत झाले असून, येथे उपोषणाला बसणाऱ्या आंदोलनकर्त्यांचे तसेच सुरक्षा कारणास्तव कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यासोबतच मैदान परिसरात अवैधरित्या होत असलेल्या वाहन पार्किंगमुळे उपोषणकर्त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मैदानात गट्टू टाकून ते व्यवस्थित उभारण्यात यावे. तसेच स्वच्छतागृहाची उभारणी करून आंदोलनकर्ते व पोलीस कर्मचारी यांना मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात. पावसाळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांना पावसापासून संरक्षणासाठी योग्य आसरा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    स्वराज इंडिया परभणी तर्फे या मागण्या सार्वजनिक रित्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या असून, उपोषण मैदानाची दयनीय अवस्था तातडीने सुधारावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

    श्रमिक विश्व

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here