मटकऱ्हाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गामध्ये साचले पाणी …

मिशन झिरो ड्रॉपआऊट`काळात विसंगती उघड

Advertisement
मटकऱ्हाळा येथील जि प्र शाळा

परभणी – तालुक्यातील मटकऱ्हाळा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये परिसरातील दोन तीन गांवातील विदयार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात परंतू पावसाळ्यामध्ये शाळेच्या वर्गामध्ये तसेच मैदानातही मोठया प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे विदयार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले आहे. या बाबत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांना वेळोवेळी सुचना देवूनही पाणी काढण्या बाबत व पाणी साचू नये या साठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामीण भागातील गोर गरीब शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत असून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मूलभूत सुविधा व सुख -सुविधांकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही शाळेच्या मैदानामध्ये साचलेले पाणी काढणे, मुरूम टाकणे व वर्गातील फरशी उचलून घेणे असे साधे काम देखील प्राशासनाच्या वतीने केले जात नाही. सध्याचा पावसाळ्याचा काळ बघता थोडा जरी पाउस पडला तरी शाळेतील मैदानावर व वर्गामध्ये पाणी शिरल्याने विदयार्थ्यांना सुट्टया घ्याव्या लागत आहेत. कोव्हीड -१९ काळामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होवू शकले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विदयार्थ्यांना शाळेपर्यंत आणणे अत्यंत महत्वाचे आहे.
विदयार्थ्याची ही गैरसोय विचारात घेता जिल्हा प्रशासनाने तात्काळ या समस्येकडे लक्ष देवून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने संबंधीत यंत्रणेस आदेश देवून शाळेतील मैदानात मुरूम टाकणे , तसेच वर्ग खोल्यातील फरशी उचलून घेणे या बाबत सूचना द्याव्या या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांच्या नावे श्री.महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन देण्यात आले.


निवेदनावर जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, मटकऱ्हाळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, उपशाखा प्रमुख माऊली गरुड, सचिन शेरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

श्रमिक विश्व न्यूज

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here