तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करीत आहे ; कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्णकरून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे.आणि आपल्या देशात दिवसाला फक्त १६ लाख लसी देण्याचा निच्चांक गाठला जात आहे ; एकेकाळी घोषणा केली कि दररोज ५० लाख लशी टोचल्या जातील
कोणत्या देशात ज्या देशात जगातील लस उत्पादक क्षमते पैकी ७० टक्के उत्पादक क्षमता आहे
१३० कोटी लोकसंख्येपैकी समजा १०० कोटी नागरिकांना दोन लसी द्यायच्या आहेत म्हणजे २०० कोटी लशीचे प्लॅनिंग हवे
कोठे आहे प्लॅनिंग ?
लसीचा उत्सव साजरा केला
४५ वयापुढच्या नागरिकांना पहिला दुसरा डोस मिळण्याची काहीही पूर्वतयारी नसताना , स्वतःहूनच १८ वर्षावरील नागरिकांना लस घेण्याची परवानगी दिली.मार्केट फोर्सेस मुळे सगळे काही नीट होईल म्हणत खाजगी क्षेत्राला लस विकत घेऊन टोचण्याचे स्वातन्त्र दिले ; खाजगी क्षेत्र काही पुढेच येत नाही
लसीचे भाव ठरवणारी कोणतीही शासकीय यंत्रणा नाही ; अमुकच भाव का याला वस्तुनिष्ठ आधार नाही ; किमान तो पारदर्शीपणे लोकांसमोर ठेवण्याचा प्रोफेशनलिझम नाही.
सुप्रीम कोर्टाने सुओ मोटो दाखल घेऊन केंद्र सरकारला टोकदार प्रश्न विचारले ; त्याची समाधानकारक उत्तरे नाहीत.
कोरोनाच्या मृत्यूचे सावट एवढे गडद आहे कि लोक काळवंडले आहेत ; सकाळी ४ वाजल्यापासून लसीसाठी रांगा लावत आहेत
सरकारी प्रवक्ते तिसऱ्या लाटेचे इशारे देत आहेत ; त्याचा अर्थ असा कि युद्ध पातळीवर सर्व नागरिकांना लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.जगातील सर्वात महाकाय लस उत्पादक कंपनीचा प्रवर्तक परदेशी जाऊन मला देशात धमकीवजा फोन येत आहेत हे सांगत आहे.
सगळे डॉट्स एकाचवेळी जोडून पहा आणि मनातल्या मनात चित्र जुळवा ; तुम्हीच ठरवा किती गंभीर आहे ते
आणि तुम्हीच ठरवा याला कोण जबाबदार धरायचे ते ? नाव घेतले कि लसीची चर्चा बाजूला आणि दुसरीच गुद्दागुद्दी सुरु; लाखो लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे , त्याचे गांभीर्य मनात वागवूया !
संजीव चांदोरकर (६ मे २०२१)





































