कारण आपल्या भौतिक प्रश्नांना आपणच निवडून दिलेले आहे …

मतदारांच्या मनावर अजून बिंबलेले नाही

0
564

शेतकरी , दूधउत्पादक , भाजी पाला पिकवणारे आंदोलन करीत आहेत

सार्वजनिक क्षेत्रातील बँका , विमा कंपन्या , संरक्षण साहित्य उत्पादन येथील कर्मचारी सर्वच अनिश्चिततेने ग्रासलेले आहेत.

खूप पूर्वीपासून आणि आता कोरोना काळात कळत्या वयातील विद्यार्थ्यंना आपल्याला अनेक गोष्टी नाकारल्या जात आहेत हे कळतंय

व्याजावर जगणाऱ्या पेन्शनर्स किंवा इतर नागरिकांचे मनातले पैशाचे हिशोब संपत नाहीत

पेट्रोल, डिझेल पासून अनेक वस्तुमालाची भाववाढीने सर्वच ग्रस्त आहेत

कोरोना काळात तर एक कुटुंब असे नसेल ज्यावर प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष विपरीत परिणाम झाला नाहीये

पण याचे प्रतिबिंब आपल्यावर कोण राज्य करणार हे निवडणुकीच्या वेळी ठरवतांना उमटत नाही ! नजीकच्या काळात उमटेल अशी शक्यता नाही

का ?


कारण आपल्या भौतिक प्रश्नांना आपणच निवडून दिलेले आपल्या नांवाने राज्य करणारे राज्यकर्ते जबाबदार आहेत , त्यांच्या कृतीने किंवा त्यांच्या निष्क्रियतेने , हेच कोट्यवधी नागरिक मतदारांच्या मनावर अजून बिंबलेले नाही

जात , धर्म , भाषा , प्रांत, भीती आणि अभिमान , अनेकानेक मानापमानाचे इश्यू , आपल्या नेत्याशी आयुष्यभर व्यक्तिगत बांधिलकी यातच सारे चूर आहेत

माणसांच्या समूहांच्या अस्मिता , समूह म्हणून टिकण्यासाठी आवश्यक असतात हे खरे

पण मानवी समूह आणि त्यातील सभासद , त्यांचे कुटुंबीय , लहान मुले यांचे आयुष्य किमान सहनीय होण्यासाठी भौतिक आधार देखील लागतात हे त्याहून खरे

आपल्याला जगण्याचे हे भौतिक आधार मिळणार कि नाही हे फक्त आणि फक्त शासनसंस्था ठरवते या विचाराची नसबंदी करण्यात आली आहे ; उदारमतवादाचे यशस्वितेचे सारे इंगित यात आहे


आपण मानतो वस्तुनिष्ठ “सत्य” व्यक्ती निरपेक्ष असते ; व्यक्तींच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नसते

पण माणस ज्यावर विश्वास ठेवतात तेच “सत्य” असे सिद्ध होत आहे ; आणि ज्यावेळी लाखो / कोट्यवधी लोक त्यावर विश्वास ठेवतात त्यावेळी तीच एक भैतिक शक्ती बनते

खूप वैफल्य आणणारे आहे हे “दुसरे” सत्य

संजीव चांदोरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here